Home उतर महाराष्ट्र नाशिक भगवानगड शिवशाही बसचे स्वागत

नाशिक भगवानगड शिवशाही बसचे स्वागत

161

आशाताई बच्छाव

IMG_20240309_075439.jpg

श्रीरामपूर , दिपक कदम तालुका प्रतिनिधी            नाशिक भगवानगड या नव्याने सुरू झालेल्या शिवशाही बसचे श्रीरामपूर येथे मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने स्वागत करण्यात आले
राष्ट्रीय जयंती उत्सव समिती वंजारी समाज यांचे प्रयत्नाने दररोज नाशिक ते भगवानगड शिवशाही बस सेवा नव्याने सुरू करणेत आली असून या बसला श्रीरामपूर एस टी डेपो मॅनेजर श्री कासार साहेब व मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने श्री.गोकुळ गायकवाड यांनी श्रीफळ वाढवून शुभेच्छा दिल्या असून या वेळी फाऊंडेशन चे सचिव ऋषीकेश मोरगे यांनी बसचे चालक यांचा शॉल बुके देऊन तर श्री.शरदराव अंबादास नवले यांनी बसचे वाहक यांचा शॉल बुके देऊन स्वागत केले असून या राष्ट्रीय जयंती उत्सव समीतीचे सचिव श्री.तुकाराम(नाना) सांगळे यांचा मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मोरगे यांनी सत्कार करून समितीचे इतर सदस्य यांना धन्यवाद देऊन शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना सांगितले की या बसमुळे भगवान गडावर जाणारे भक्तांची चांगली सोय झाली असून बसला शुभेच्छा देऊन समितीचे सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या ह्या शुभारंभ कार्यक्रमास डेपो मॅनेजर सह इतर अधिकारी आणि प्रवाशी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करणे करीता फाऊंडेशनचे सर्व सदस्य तसेच श्री.अनील भागवत, श्री.गोकुळ गायकवाड, श्री.शरद नवले ,शुभम आढाव यांनी परीश्रम घेतले.

Previous articleसन्मान मातृत्व, नेतृत्व व कर्तृत्वाचा !
Next articleभारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयातर्फे ६ मार्च रोजी वार्तालाप संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.