Home उतर महाराष्ट्र भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयातर्फे ६ मार्च रोजी वार्तालाप...

भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयातर्फे ६ मार्च रोजी वार्तालाप संपन्न

14
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_075857.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयातर्फे ६ मार्च रोजी वार्तालाप कार्यशाळेत उत्तर नगर जिल्ह्यातील शिर्डी, राहता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, राहुरी, नेवासा आणि कोपरगाव परिसरातील सुमारे 100 पत्रकार सहभागी झाले होते.’अध्यात्मिक पर्यटनाचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम’ या विषयावर वार्तालाप माध्यम परिषदेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक शिरिष वमने, साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ रवींद्र ठाकूर, पत्र सूचना कार्यालय (पुणे) उपसंचालक महेश अय्यंगार, माध्यम अधिकारी हर्षल आकुडे हे उपस्थित होते.
कार्यशाळेत साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी ‘अध्यात्मिक पर्यटनवाढीसाठी संस्थानच्या भावी योजना, धार्मिक पर्यटन : आर्थिक आणि सामाजिक परिणाम’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार आणि आर्थिक विषयातील तज्ज्ञ यमाजी मालकर तर विकास पत्रकारिता आणि त्याचे ग्रामीण भागातील महत्त्व’ या विषयावर सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी महिती दिली.
एमटीडीसी (नाशिक)चे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरीष्ठ प्रबंधक प्रमोद दहिफळे, तसेच जनसेवेसाठी माध्यमांना पीआयबीची कशी मदत होईल’ या विषयावर पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम अधिकारी हर्षल आकुडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पत्र सूचना कार्यालयाच्या माहिती सहायक सोनल तुपे यांनी केले. या वार्तालाप कार्यक्रमात मला सहभागी होता आले.

Previous articleनाशिक भगवानगड शिवशाही बसचे स्वागत
Next articleडि पॉल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महिला दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here