आशाताई बच्छाव
कोद्री येथे अंगणात वीज कोसळली विजेच्या कर्जनेत बरसला पाऊस!
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
संग्रामपूर तालुक्यातील कोद्री येथे दिनांक १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी आभाळात ढग जमा होऊन विजेच्या प्रचंड गर्जनेत वादळीवाऱ्यासह पाऊस बरसला. दरम्यान कोद्री येथील गोपाल भारसाकडे यांच्या घरासमोर काशिनाथ खोंड यांच्या अंगणातील कन्हेराच्या झाडाजवळ विजेचा सौम्य झटका बसला.
यामध्ये कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नाही मात्र गावातही वीज कोसळल्याच्या घटना घडू लागल्याने गावकरी भयभीत झाल्याचे गावातील प्रतिष्ठित नागरिक अभिमन्यू पाटील यांनी सांगितले.पाऊस कमी असला तरी विजेच्या प्रचंड गर्जनेमुळे प्रत्येकाला आपल्या घरावर वीज पडते की काय? अशी भीती वाटत होती अशेही त्यांनी सांगितले. मेघगर्जनेसह पाऊस येत असल्याने व कमी वेळेत जास्त पाऊस बरसत असल्याने शेती पिकाचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच अतिवृष्टी पावसा नंतर काही प्रमाणात बचावलेल्या पिकांचा हातात तोंडाशी आलेला घास निसर्ग हिसकावून घेत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
त्यामुळे आपातकालीन, नैसर्गिक आपत्ती विभागाने अशावेळी मुख्यालयी राहणे गरजेचे असून कर्तव्ये दक्ष संग्रामपूर तहसीलदार यांनी तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती विभागात नेमलेल्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचा भ्रमणध्वनी नंबर प्रसिद्ध करावा त्यामुळे सर्वसामान्यांना आपातकालीन वेळेत नैसर्गिक आपत्ती सारख्या घटना घडल्यास वेळेत संपर्क करता येईल. आणि अशा कर्मचारी अधिकाऱ्यांनी कर्तव्य दक्षपणा दाखवत अश्या वेळेत नागरिकांना हिम्मत देत व वेळेत मदत व्हावी म्हणून त्यांनी मुख्यालयी राहणे सुद्धा गरजेचे आहे. असे सुद्धा भयभीत झालेल्या नागरिकांकडून बोलल्या जात आहे .






