Home बुलढाणा संग्रामपुरात दहा वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला! अपहरण करणाऱ्या महिलेच्या हाताला चावा...

संग्रामपुरात दहा वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला! अपहरण करणाऱ्या महिलेच्या हाताला चावा घेऊन मुलीने स्वतःला सोडविले..

112
0

आशाताई बच्छाव

IMG-20220912-WA0028.jpg

संग्रामपुरात दहा वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला!
अपहरण करणाऱ्या महिलेच्या हाताला चावा घेऊन मुलीने स्वतःला सोडविले..

धाडसा बद्दल कु. श्रुतीचा संग्रामपूर तहसीलदार यांनी केला सत्कार..

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क )

संग्रामपूर येथील पाचव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका दहा वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु सदर मुलीने अपहरण करण्यासाठी ओढत नेणाऱ्या महिलेच्या हाताला चावा घेऊन शाळेत पळ काढल्याने ती बचावली काळ्या रंगाची ओमनी गाडीतून आलेल्या दोन पुरुष आणि एका महिलेचा अपहरणाचा डाव या मुलीने हाणून पाडल्याची घटना शनिवारी 10 सप्टेंबर रोजी संग्रामपुर नगरपंचायत हद्दीत घडली या घटनेमुळे पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर येथील रहिवासी व सध्या परभणी जिल्ह्यातील वसमत येथे नांदुरा अर्बन बँकेत कार्यरत कर्मचारी राऊत यांची मुलगी इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असून ती संग्रामपूर येथे आजोबाकडे राहते शनिवारी ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरून सकाळी दहा वाजता बाहेर पडली दररोज तिच्यासोबत असणारी मैत्रीण आजारी असल्याने ती एकटीच शाळेत जात होती आनंद माता मंदिर डॉक्टर सुरतकार हॉस्पिटल जवळ काळ्या रंगाची ओमनी गाडीतून दोन पुरुष व एक महिला हे दोघे अपहरणाच्या उद्देशाने तेथे आले यातील महिलेने गाडीतून उतरून सदर मुली जवळ येत तिचा हात धरला आणि तिला ओडत ओमणी गाडी कडे घेऊन जाऊ लागली यावेळी मुलीने सदर महिलेच्या हाताला चावा घेतला आणि आपली सुटका करून घेतली व तेथुन थेट शाळेत पळाली शाळेत पोहोचल्या वर तिने हा प्रकार शिक्षकांना सांगितला परंतु शिक्षकांनी ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याने तिने सांगितलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने अपहररणासाठी आलेले ते अज्ञात दोन्ही ईसम आणि एक महिला पसार झाली त्यावेळी जर शिक्षकांनी कार्य तत्परता दाखवून पोलिसांना माहिती दिली असती तर अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्यांना जेरबंद करता आले असते. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये दहशत पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संग्रामपूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी अपहरण करणाऱ्या महिलेच्या तावडीतून धाडस दाखवत सुटका करून घेतलेल्या श्रुती विनोद राऊत या विद्यार्थिनीचे घरी जाऊन भेटवस्तू व मिठाई देऊन कौतुक केले. ज्याप्रमाणे एकट्या मुलीने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून वेळीच आपली सुटका करून घेतली. त्याचप्रमाणे यापुढे अशा घटना घडु नये म्हणून स्थानिक पोलीस पाटील , नगरपंचायत व ग्रामपंचायत प्रशासनाने तसेच प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी समजून घेऊन अशा अनोळखी फिरणाऱ्या व फेरीवाल्यांची चौकशी करावी व संशयित वाटणाऱ्या इसमाबद्दल स्थानिक पोलीस चौकी किंवा पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असा लाख मोलाचा संदेश तहसीलदार यांनी बोलताना दिला. दरम्यान अपहरणाचा प्रयत्न झालेल्या मुलीच्या नातेवाइकांनी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तामगाव पोलिसांनी अज्ञात एक महिला, दोन पुरुष तिघांविरुद्ध कलम ३६३, १५१, ५०६, ३४ आयपीसी नुसार गुन्हा दाखल केला असून अशा अपहरणा सारख्या गंभीर प्रकाराकडे तामगाव पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देत तपास करून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Previous articleसंरक्षण भिंत कोसळली, गणपती मंदिरावर झाड पडले , पावसामुळे जनजीवन विस्कळीत
Next articleकोद्री येथे अंगणात वीज कोसळली विजेच्या कर्जनेत बरसला पाऊस!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here