Home रत्नागिरी संरक्षण भिंत कोसळली, गणपती मंदिरावर झाड पडले , पावसामुळे जनजीवन विस्कळीत

संरक्षण भिंत कोसळली, गणपती मंदिरावर झाड पडले , पावसामुळे जनजीवन विस्कळीत

152
0

आशाताई बच्छाव

IMG-20220912-WA0018.jpg

संरक्षण भिंत कोसळली, गणपती मंदिरावर झाड पडले , पावसामुळे जनजीवन विस्कळीत

राजापूर/रत्नागिरी,(सुनील धावडे) : शनिवारी दिवसभर संततधार पडणाऱ्या पावसामुळे राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्याने रविवारी मध्यरात्री जवाहर चौकापर्यंत धडक दिली होती. मात्र रविवारी सकाळी पाऊस काहीसा कमी झाल्याने पाण्याची पातळी ओसरली. मात्र तरीही संततधार पडणाऱ्या पावसामुळे नागरिक, व्यापारी सतर्क झाले आहेत. तर शहरातील भटाळी भागात संतोष बापट यांच्या घराजवळील रस्त्याची संरक्षण भिंत कोसळली असून शहरानजीकच्या धोपेश्वर मसुरकरवाडी येथील गणपती मंदिरावर झाड पडले आहे.

राजापूर शहर आणि तालुका परिसरात शनिवार सकाळ पासून पावसाचा जोर वाढला असून रविवारीही तो कायम होता. तालुक्यात शनिवारी सरासरी ११७.२० मिलीमिटर पावसाची नोंंद झाली आहे. यामध्ये राजापूर मंडळ १७३ मिमी, ओणी मंडळ ११२मिमी, कुंभवडे मंडळ ९८मिमी, नाटे मंडळ ९५मि, जैतापूर मंडळ १३८मिमी, कोंडये तरफ सौंदळ ७१मिमी पाचल मंडळ१४३ मिमी, सौंदळ मंडळ १०७मिमी पावसाची नोंद झाली आहे. धोपेश्वर मसुरकरवाडी येथील गणपती मंदिरावर पहाटे झाड कोसळले आहे. मात्र तात्काळ स्थानिक ग्रामस्थांनी हे हटविण्याचे काम हाती घेतले. अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्याने नदीकिनाऱ्यालगत असलेली भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर काही ठिकाणी भातशेतीचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here