Home मुंबई शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20220912-WA0017.jpg

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई ,(अंकूश पवार): शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन झाले आहे. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे वयाच्या 99 व्या वर्षी स्वामी स्वरूपानंद यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू अशी त्यांची ओळख होती.
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे देश-विदेशात भक्त आहेत. मध्य प्रदेशमधील महाकौशल झोनमधील सिवनी जिल्ह्यातील दिघौरी येथे 2 सप्टेंबर 1924 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. नुकताच त्यांचा 99 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे 1982 मध्ये गुजरातमधील द्वारका शारदा पीठ आणि बद्रीनाथ येथील ज्योतिर मठाचे शंकराचार्य बनले. स्वामी शंकराचार्य सरस्वती यांच्या पालकांनी त्यांचे बालपणी पोथीराम उपाध्याय असे नाव ठेवले होते. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्म कार्य हाती घेतले. त्यांनी वेद-वेदांग आणि शास्त्रांचे शिक्षण काशी (उत्तर प्रदेश) येथे घेतले.

Previous articleओबीसींचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत; ओबीसी जनमोर्चाची मागणीं, पटोले यांना दिले निवेदन
Next articleसंरक्षण भिंत कोसळली, गणपती मंदिरावर झाड पडले , पावसामुळे जनजीवन विस्कळीत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here