• Home
  • 🛑 ई-कॉमर्स कंपन्यांचा ‘सेल’ ठरला हीट ; ऑनलाइन खरेदीत स्मार्टफोनची बाजी 🛑

🛑 ई-कॉमर्स कंपन्यांचा ‘सेल’ ठरला हीट ; ऑनलाइन खरेदीत स्मार्टफोनची बाजी 🛑

🛑 ई-कॉमर्स कंपन्यांचा ‘सेल’ ठरला हीट ; ऑनलाइन खरेदीत स्मार्टफोनची बाजी 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 29 ऑक्टोबर : ⭕ चालू महिन्यात १५ ते २१ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रीच्या निमित्ताने ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या ऑनलाइन मंचांवरून २९ हजार कोटी रुपयांच्या अर्थात ४.१ अब्ज डॉलरच्या वस्तूंची विक्री केली आहे. गेल्यावर्षातील याच काळाच्या तुलनेत ही विक्री ५५ टक्के अधिक आहे. रेडसिअर या संशोधन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, गेल्यावर्षी याच काळात ऑनलाइन विक्री २.७ अब्ज डॉलरची झाली होती.

यंदा ऑनलाइन खरेदीत स्मार्टफोननी बाजी मारली आहे. एकूण वस्तूंच्या विक्रीमध्ये स्मार्टफोनची विक्री ४७ टक्के झाली आहे. नवे स्मार्टफोन आणि परवडणाऱ्या किंमतींत बाजारात दाखल झालेले स्मार्टफोन असे दर मिनिटाला देशात १.५ कोटी रुपयांचे स्मार्टफोन ऑनलाइन मंचांवरून विकले गेले आहेत. या सर्व ऑनलाइन विक्रीचा जोर टियर-२ शहरांतून अधिक दिसून आला आहे. सणासुदीच्या दिवसांत सर्वाधिक ऑनलाइन विक्री करणारा समूह म्हणून फ्लिपकार्ट समोर आला आहे. गेल्यावर्षी याच काळात ऑनलाइन मंचावर २.८ कोटी दुकानदार होते. ही संख्या यंदा ५.२ कोटी झाली आहे.

निमशहरी भागातील ग्राहकांचा ऑनलाइन शॉपींगला चांगला प्रतीसाद मिळत असल्याचे ‘रेडसिअर’ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.नवरात्री सोबतच ई-कॉमर्स कंपन्यांचा शॉपींग फेस्टिव्हल सुरु झाला आहे. जास्तीत जास्त सवलती आणि आकर्षक ऑफर्समधून प्रत्येक कंपनी ग्राहकांना भूरळ पडत आहेत. करोना संकटाचा काळ असून देखील कंपन्यांसाठी हा सीझन लाभदायक ठरला आहे. अवघ्या चार दिवसात चार बड्या ई-कॉमर्स कंपन्यांनी देशभरात तब्बल २२००० कोटींची विक्री करत बक्कळ कमाई केली आहे.

‘रेडसिअर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, मायंत्रा आणि स्नॅपडिल या चार कंपन्यांनी फेस्टिव्ह सीझनच्या सुरुवातीच्या ४.५ दिवसात ३.१ अब्ज डॉलर्सची (२२००० कोटी रुपये) विक्री केली होती. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री जास्त आहे. गेल्या वर्षी फेस्टिव्ह सीझनच्या पहिल्या ४.५ दिवसात ई-कॉमर्स कंपन्यांची २.७ अब्ज डॉलर्सची विक्री झाली होती.⭕

anews Banner

Leave A Comment