• Home
  • 🛑 *कोट्यवधी खर्च करूनही बीआरटीचे घोडे अडलेलेच!* 🛑

🛑 *कोट्यवधी खर्च करूनही बीआरटीचे घोडे अडलेलेच!* 🛑

🛑 *कोट्यवधी खर्च करूनही बीआरटीचे घोडे अडलेलेच!* 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕सातारा रस्त्यावरील बीआरटी प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील अद्याप बीआरटी सुरू करता येईल, अशी अवस्था नाही. बीआरटी सुरू करण्यासाठी कात्रज आणि स्वारगेट चौकात बसथांबे नसल्यामुळे बीआरटी सुरू करता येणार नसल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आश्विनी कदम यांनी दिली.

पुणे शहरातील सर्वात बहुचर्चित प्रकल्प असलेल्या बीआरटीची अवस्था अतिशय वाईट आहे. 2017 ते 2020 या काळात सुमारे 108 कोटी इतका खर्च बीआरटी प्रकल्पावर करण्यात आला आहे. बीआरटी दुरुस्ती आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली रस्त्याच्या कामाला खर्च करण्यात?आला. रस्ते मोठे झाले पुन्हा लहान झाले. रस्त्यावर प्रयोग झाले. मात्र बीआरटी प्रकल्प काही सुरू होऊ शकला नाही.

कदम म्हणाल्या, महापालिका प्रशासनाने 80 लाख रुपयांचा एक बसथांबा याप्रमाणे खर्च केला आहे.

आता या बसथांब्यांना सरकते दरवाजे आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवाव्यात, अशी मागणी पीएमपीकडून करण्यात आली आहे. कात्रज आणि स्वारगेट याठिकाणी बसथांबेच नसल्यामुळे बीआरटी सुरू होऊ शकत नाही. असे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे असे कदम यांनी सांगितले.

या मार्गावरील बीआरटीची दुरावस्था झाली व मेट्रो प्रकल्पाला उशीर झाला आहे. बसटॉपमधील अनेक वस्तू चोरीला जात?आहेत. याठिकाणी सुरक्षारक्षक नाहीत, वेळेत बीआरटी सुरु झाली नाहीतर पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतील,असे कदम म्हणाल्या.

बीआरटी वेळेत सुरू होणार नसेल, तर सर्व सामान्य नागरिकांसाठी हा रस्ता सुरू करा. पुणेकरांचे कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत.

त्यामुळे पंधरा दिवसांत बीआरटी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आश्विनी कदम यांनी दिला आहे…..⭕

anews Banner

Leave A Comment