Home विदर्भ एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत एक दिवस ई पीक पाहणीचा! तहसीलदार शेगाव..

एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत एक दिवस ई पीक पाहणीचा! तहसीलदार शेगाव..

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20220912-WA0021.jpg

एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत एक दिवस ई पीक पाहणीचा! तहसीलदार शेगाव..

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम १ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान राबवायचा आहे. त्यामध्ये तालुकास्तरीय व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेणे त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे. तसेच शेतकऱ्यांसोबत त्यांच्या शेतात जाऊन शेतीची परिस्थिती जाणून घेणे या बाबी करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने सन 2021 मधील 15 ऑगस्ट पासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या सात बारा वरील पीक पेऱ्याची नोंद करण्यासाठी ई पिक पाहणी या प्रणालीचा विकास करण्यात आलेला आहे. ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेताची पीक पाहणी स्वतः करता येते व त्याद्वारे त्यांच्या सातबारावर वरील पिकांची नोंद घेण्यात येते सध्याच्या 2022 मधील खरीप हंगामाची पिक पाहणी सुरू आहे . त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना पीक पाहणी वर्जन दोन हे ॲप डाऊनलोड करून त्यानुसार पिक पाहणी करता येते वरील प्रमाणे शासनाच्या दोन्ही उपक्रमांतर्गत बळीराजाला मदत व्हावी व त्यांच्या कामाला गती यावी या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात सर्व शेतकरी बांधवांसाठी दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी एक दिवस ई पिक पाहणीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये शेगाव तालुका प्रशासनातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व त्यांच्या गाव स्तरीय यंत्रणा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ईपीक पाहणी कशी करावी याचे मार्गदर्शन दिले जाईल व प्रत्यक्षात ई पीक पाहणी करण्यास मदत करून शेतकऱ्यांकडून ती पूर्ण करून घेण्यात येईल.
शेगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत ऑपरेटर, शेतु केंद्र चालक, कृषी केंद्र चालक, स्वस्त धान्य दुकानदार, कृषी मित्र व गावातील इतर पदाधिकारी हे सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणीचे कामकाज पूर्ण करून घेतील. वरील कामासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत योग्य ते मार्गदर्शन समन्वय व सहाय्य करण्यात येईल. तरी शेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी राबविल्या जाणाऱ्या एक दिवस पिक पाहणीचा या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन जास्तीत जास्त पीक पाहणी च्या नोंदी करून घ्याव्यात. असे आव्हान शेगावचे तहसीलदार, गटविकास अधिकारी , सहाय्यक निबंधक सहसंस्था व शेगाव तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात शेतकऱ्यांना असे आव्हान करण्यात आले आहे.

Previous articleकोद्री येथे अंगणात वीज कोसळली विजेच्या कर्जनेत बरसला पाऊस!
Next articleशिक्षकाचे थेट मुख्यमंत्र्याना खुले पत्र, अशैक्षनिक कामे थोपवल्याने केली नाराजी व्यक्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here