Home नांदेड देगलूर महाविद्यालची कु.धनश्री येरगुलवार चा जिल्हा उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरव.

देगलूर महाविद्यालची कु.धनश्री येरगुलवार चा जिल्हा उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरव.

103
0

आशाताई बच्छाव

IMG_20240121_081523.jpg

देगलूर महाविद्यालची
कु.धनश्री येरगुलवार चा जिल्हा उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरव.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर :-लातूर विभागीय विद्यार्थी नेतृत्व गुण विकास शिबिरात देगलूर महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले,
शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर आणि राष्ट्रीय सेवा योजना +2 च्या वतिने नेरली जिल्हा नांदेड येथे लातूर विभागीय विद्यार्थी नेतृत्व गुण विकास शिबिरात देगलूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदणीत आपले कलागुण सादर केले
ता.जि नांदेड जवळ असलेल्या नेरली येथील “नंदनवन” कुष्ठधाम येथे लातूर विभागीय विद्यार्थी नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यात कु धनश्री येरगूलवारचा जिल्हा उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या शिबिरास अ.व्या शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी एस एस वानोळे तसेच श्रीमती देबडवार ए एस यांनी कु. ऐकलारे ऐश्वर्या,कु. धनश्री अरगुलवार,कु. वेदिका बाचीपले. कु.अस्मिता पलकोंडवार ,कु.रूपाली कु स्वामी, कु. पुजा जुक्कावाड या विद्यार्थीनीसह सहभाग नोंदविला होता.
दिनांक १९व २०रोजी झालेल्या दोन दिवसीय विकास शिबिरात “युवक नेतृत्वाची उभारणी” या विषयावर माजी उपसंचालक शिक्षण नंदन नागरे ,”राष्ट्रीय सेवा योजना व युवक नेतृत्व”या विषयावर डॉ. मारुती लुटे तसेच बालाजीराव थोटवे आणि नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर आपले विचार व्यक्त केले यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात देगलूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपले कलागुण सादर केले. समारोप प्रसंगी सहाय्यक शिक्षण संचालक लातूर डॉ. दत्तात्रेय मठपती तसेच माजी शिक्षक संचालक महाराष्ट्र राज्य गोविंद नांदेडे रा.सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डाॅ संदीप जगदाळे यांनी मार्गदर्शन केले दोन दिवसीय शिबीरात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून रा सेवा योजनेचे विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता यशस्वी कु धनश्री येरगुलवार चे अ.व्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे सचिव मा.शशीकांत चिद्रावार सहसचिव सूर्यकांतराव नारलावार कोषाध्यक्ष विलासशेठ तोटावार कार्यकारीणी सदस्य राजकुमार महाजन देवेंद्र मोतेवार, गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे ,डाॅ कर्मवीर उन्नग्रतवार, जनार्दनशेठ चिद्रावार, चद्रकांत नारलावार प्राचार्य डॉ.मोहन खताळ ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार ऊपप्राचार्य प्रा उत्तमकुमार काबंळे पर्यवेक्षक संग्राम पाटील कार्यालयीन अधीक्षक गोविंद जोशी आदीनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here