Home जालना श्रीराम प्राण प्रतिष्ठापना:- संस्कार प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांची भव्य शोभायात्रा,ठिकठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी

श्रीराम प्राण प्रतिष्ठापना:- संस्कार प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांची भव्य शोभायात्रा,ठिकठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी

15
0

आशाताई बच्छाव

IMG-20240121-WA0037.jpg

श्रीराम प्राण प्रतिष्ठापना:- संस्कार प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांची
भव्य शोभायात्रा,ठिकठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी
जालना, दि. २०(ब्युरो चीफ दिलीप बोंडे)- येथील जनजागृती मंडळ संचलित संस्कार प्रबोधिनी
विद्यालयाच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठापना अनुषंगाने आज सकाळी भव्य
शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभा यात्रेतील जयघोषाने आणि भगवे ध्वज
यामुळे वातावरण दुमदुमून गेले होते. श्रीरामलल्लाच्या जयघोषात सकाळी
शाळेच्या प्रांगणातून विविध वेशभूषेत श्रीराम, लक्ष्मण,सीता,दशरथ,शबरी
माता यांच्या सजीव देखाव्या सहित विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले
होते.
या शोभायात्रेची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून जिल्हा संघचालक डॉॅ.नितीन
खंडेलवाल, जिल्हा कार्यवाह कमलेशजी कुकडेजा,नगर कार्यवाह राम
सुरी,नगरसेवक अशोक पांगारकर,गणेश सुपारकर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश
कुलकर्णी,सचिव विजय देशमुख,विनायकराव देशपांडे,भास्करराव काळे यांच्या
उपस्थितीत शोभा यात्रेची सुरुवात करण्यात आली. भाग्यनगर,इंदिरानगर,
प्राचीन कचेरी रस्ता,शनी मंदिर,सराफ नगर आणि शाळेचे प्रांगण येथून शाळेत
शोभायात्रा विसर्जित करण्यात आली.शोभायात्रेतील श्रीरामाच्या जयघोषाने
वातावरण दुमदुमून गेले होते. गेल्या दोन दिवसापासून श्रीराम प्रतिष्ठापना
पार्श्वभूमीवर विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यामध्ये डॉ.पद्माकर सबनीस यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यात
बोलताना डॉ.सबनीस म्हणाले की मर्यादा पुरुषोत्तम रामासारखे होणे
प्रत्यक्षात शक्य आहे.त्याला संस्काराची जोड असणे आवश्यक आहे.कारण
श्रीराम मुलगा भाऊ पुत्र म्हणून सर्वश्रेष्ठ होते. असे ते म्हणाले. या
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous articleदेगलूर महाविद्यालची कु.धनश्री येरगुलवार चा जिल्हा उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरव.
Next articleस्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत लासलगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं मंदिरात स्वच्छता अभियान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here