Home भंडारा धान खरेदीचे आदेश देण्यात आलेल्या संस्थांच्या मागण्या मंजूर करा भंडारा जिल्हा धान...

धान खरेदीचे आदेश देण्यात आलेल्या संस्थांच्या मागण्या मंजूर करा भंडारा जिल्हा धान खरेदी संघाची मागणी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

40
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231028-064540_WhatsApp.jpg

धान खरेदीचे आदेश देण्यात आलेल्या संस्थांच्या मागण्या मंजूर करा
भंडारा जिल्हा धान खरेदी संघाची मागणी
जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) जिल्ह्यातील धान खरेदीचे आदेश देण्यात आलेल्या संस्थांना धान खरेदी करण्या करिता जाचक अटी लावण्यात आलेल्या आहेत हया अटी खरेदी संस्थांना परवडण्यासारखी नसुन हया अटी तात्काळ प्रभावाने रदद करून भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी संस्थांच्या मागण्या पुर्ण करण्यात याव्यात यामागणी चे निवेदन भंडारा जिल्हा धान खरेदी संघाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनात
जिल्हाधिकारी यांनी धान खरेदी संस्थांची व पणन अधीकारी यांची आपल्या अध्यक्षतेखाली संयुक्त सभा घ्यावी,तसेच खरेदी केंद्राकरिता रू. 20 लक्ष अनामत रक्कम रोखीने भरणा करण्याबाबद अट शासनाने घातली आहे ती रद्द करण्यात यावी. व “ब’ वर्ग संस्थेस किमान रक्कम रू. 1 कोटी बँक गॅरेंटी ची रक्कम भरणा करण्याची अट रदद करावी, धानाची घट 0.50 टक्के असुन 3 टक्के करणे व खरेदी सुरू होताच धानाची उचल करावी संस्थांना खरेदी कमिशन प्रति क्विंटल रू. 60 करावे , गोदाम भाडे जेव्हा पर्यंत गोदामामध्ये धान साठवुन ठेवण्यात येते तेव्हा पर्यंतचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भाडे प्रमाणपत्रा नुसार किंवा तांदुळ ठेवण्यात येतात व त्या गोदामाचे भाडे मिळतात त्या प्रमाणे गोदाम भाडे गोदाम मालकांना द्यावे आदी मागण्या चे निवेदन उपजिल्हाधिकारी लिना फडके यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी भंडारा जिल्हा धान खरेदी संघाचे सचिव ठाकचंद मुंगूसमारेसह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleअनुसूचित क्षेत्रातून गावे वगळण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही !
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदीची शिर्डीला भेट शेतकऱ्यांशी साधला संंवाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here