• Home
  • शक्तीहीन शेतकरी वाऱ्यावर: नेते शक्ती प्रदर्शनाच्या दौऱ्यावर! कृषिप्रधान जिल्ह्याचे दुर्दैवी चित्र

शक्तीहीन शेतकरी वाऱ्यावर: नेते शक्ती प्रदर्शनाच्या दौऱ्यावर! कृषिप्रधान जिल्ह्याचे दुर्दैवी चित्र

आशाताई बच्छाव

IMG-20220629-WA0045.jpg

शक्तीहीन शेतकरी वाऱ्यावर: नेते शक्ती प्रदर्शनाच्या दौऱ्यावर! कृषिप्रधान जिल्ह्याचे दुर्दैवी चित्र

ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
बुलडाणा -: जून संपत आला तरी अपुराच ठरणारा पाऊस, खत बियाणांचा काळाबाजार यामुळे चोहोबाजुनी अस्मानी- सुलतानी संकटांच्या चक्रव्यूहात अडकलेला शक्तीहीन बळीराजा आणि त्यांना वाऱ्यावर सोडून शक्ती प्रदर्शनाच्या दीर्घ दौऱ्यावर असलेले नेते हे विदारक चित्र आहे कृषिप्रधान बुलडाणा जिल्ह्याचे…

१३ तालुके, ९ लाख ६७ हजारांवर क्षेत्रफळ, कमीअधिक पंचवीस लाख लोकसंख्या , ७ लाख ४० हजार हेक्टर खरीप पिकाखालील तर सव्वालाख हेक्टर रब्बीखालील क्षेत्र, सव्वा सहा लाख शेतकरी, ७६१ वार्षिक सरासरी पर्जन्यमान, असे जिल्ह्याचे भौगोलिक वजा कृषी वैभव आहे. मात्र कोरडवाहू क्षेत्र (खूपच) जास्त असल्याने हे वैभव केवळ आणि केवळ पावसाच्या मेहेरबानी वर अवलंबून आहे. आणि वरुण राजाची ही कृपा अलीकडे होतच नाही असे चित्र आहे. यंदाचा खरीप हंगाम देखील याला अपवाद नाहीये! जून संपत आला तरी सार्वत्रिक स्वरूपाचा नियमित, दमदार पाऊस न झाल्याने खरीप हंगाम आत्ता पासूनच धोक्यात आला असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही!: नेते शक्ती प्रदर्शनाच्या दौऱ्यावर! कृषिप्रधान जिल्ह्याचे दुर्दैवी चित्र

anews Banner

Leave A Comment