Home नांदेड स्वराज्य दुर्गभ्रमंती समूह यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा...

स्वराज्य दुर्गभ्रमंती समूह यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

243
0

राजेंद्र पाटील राऊत

स्वराज्य दुर्गभ्रमंती समूह यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.
नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे युवा मराठा न्यूज

स्वराज्य दुर्गभ्रमंती समूह व हॉलीबॉल संघ नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी श्री.योगेश अशोकराव पाटील बावणे व प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगावचे श्री अशोकराव पवळे सर ग्रीन व्हाँली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गंगाराम पटेल उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समूहाच्या वतीने करण्यात आला आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शाल पुष्पहार व पुस्तक रुपीभेट देऊन सन्मान करण्यात आला.
1) स्नेहा देविदास जमदडे
2) अपूर्वा दयानंद खंडे
3) कार्तिकी बालाजी घोनशेट्टे
4) सोहम निलेश कोटगिरे
5) शैलेश बालाजी पटलेवाड
6) आरूष श्रीनिवास पदमावार
7) शर्वरी शंकर हासगुळे
8) तृप्ती विजय कु-हाडे
याबरोबर समूहातील सदस्य श्री.बालाजी घोनशट्टे सेट परिक्षा उत्तीर्ण व श्री.शिवशंकर स्वामी
पेट परिक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समूहातील सदस्य अशोकराव पाटील, वसंत बोनागिरे, सचिन तेहरा, कपिल गारटे,लक्ष्मण ब्रम्हकर,सूर्यकांत मुजळगे, विजय कु-हाडे,पंगे सर, विजय जाधव,सदाशिव जाधव,पांडुरंग भोसले,चव्हाण सर, शरद पाटील, श्रीनिवास पदमवार, निलेश कोडगिरे
बालाजी घोनशट्टे,पटलेवाड सर, दयानंद खिंडे, पवळे सर, प्रेम जोगदंड,देविदास जमदडे, श्याम शिंपाळे,माधव घाटोळे,नागनाथ वाढवणे, शंकर हासगुळे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला नांदेड वरुन श्री.महेद्र बुध्धपा सर आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर हासगुळे व प्रस्ताविक नागनाथ वाढवणे व आभार देविदास जमदडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here