Home नांदेड कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संकटापूर्वी 15 ते 20 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे.-भागवत...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संकटापूर्वी 15 ते 20 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे.-भागवत पाटील सोमुरकर

91
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संकटापूर्वी 15 ते 20 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे.-भागवत पाटील सोमुरकर
नांदेड,(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
कोरोना (COVID-19) तिसऱ्या लाटेच्या संकटापूर्वी पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपले लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.असे आवाहन शिवसेनेचे भागवत पाटील सोमूरकर यांनी केले आहे ओमिक्रोन हा नवा विषाणू राज्यात वेगाने पसरत आहे .‌ त्यावर मात करण्यासाठी 3 जानेवारीपासून राज्यात सर्वत्र पंधरा ते अठरा वर्षांपर्यंतच्या तरूणांना लसीकरण करण्यात येत आहे , याचा या वयोगटातील , मुला मुलींनी स्वतः पूढाकार घेऊन न घाबरता आपले लसीकरण करून घ्यावे व इतरांना ही लसीकरण करून घेण्याकरिता प्रेरित करावे . असे आवाहन शिवसेनेचे भागवत पाटील सोमुरकर यांनी केले आहे. देगलूर तालुक्यातील सर्व ,खेडे गाव , वाड्यावस्त्या , ताड्यांच्या विद्यार्थ्यांनी लसीकरण करून आदर्श सर्वासमोर ठेवावा . प्रत्येक गावच्या लसीकरण
केंद्रावर लस उपलब्ध असुन लसीकरण करून घ्यावे. देगलूर तालुक्यातील व शहरातील विद्यार्थ्यांनी केंद्रावर जाऊन आपले लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.. तसेच ज्या ज्या अठरा वर्षांच्या पुढील नागरिकांनी अजून एक ही लसीकरणाचा डोस घेतला नाही , अशा नागरिकांनी ही लसीकरण पूर्ण करावे , असे आवाहन शिवसेनेचे भागवत पाटील सोमूरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here