• Home
  • भूमी अभिलेख कार्यालयामधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा -आँल मिडिया प्रेस असोसिएशन बूलडाणा जिल्हा अध्यक्ष तथा ब्यूरो चिफ यूवा मराठा न्यूज माधव उर्फ स्वप्नील देशमुख

भूमी अभिलेख कार्यालयामधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा -आँल मिडिया प्रेस असोसिएशन बूलडाणा जिल्हा अध्यक्ष तथा ब्यूरो चिफ यूवा मराठा न्यूज माधव उर्फ स्वप्नील देशमुख

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0034.jpg

भूमी अभिलेख कार्यालयामधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा -आँल मिडिया प्रेस असोसिएशन बूलडाणा जिल्हा अध्यक्ष तथा ब्यूरो चिफ यूवा मराठा न्यूज माधव उर्फ स्वप्नील देशमुख

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

बूलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर भूमी अभिलेख कार्यालयामधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी उपअधिक्षक भुमी अभिलेख तथा विषेश उपअधिक्षक कार्यालय संग्रामपूर यांच्याकडे केलीआहे.
देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, संग्रामपूर भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक आणि फसवणूक केली जात आहे. तसेच संबंधित कार्यालयात शेतकऱ्यांचे शेतीच्या मोजणी पासून तर तालुक्यातील बराच नागरिकांचे जागेच्या नोंदी व इतर कामांसाठी अर्ज दिलेले असतात आणि नागरिकांना वारंवार कार्यालयात आपल्या कामाकरता चकरा माराव्या लागतात त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हदबल झालेल्या नागरिकांकडून शेवटी कार्यालयातील काही लोकांकडून पैशाची मागणी होते लवकर काम करून लागत असल्यास अशाप्रकारे कार्यालयात भ्रष्टाचार होत असून यावर ठोस पावले उचलून भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.
याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदरच्या तक्रारीची दखल घेऊन होणाऱ्या भ्रष्टाचाराला त्यांनी वेळीच आळा घालावा. आणि सामान्य नागरिकांची होणारी लूट थांबवावी तसेच भ्रष्ट अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी व त्यांची चौकशी करून भ्रष्टपणे झालेल्या आर्थिक व्यवहाराची त्यांच्याकडून चौकशी करण्यात यावे तसेच सर्वसामान्य जनतेला या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या जाचातून सोडवावे, असे निवेदन स्वप्नील उर्फ माधव देशमुख यांनी संबंधित विभागाकडे लेखी स्वरूपात दिले आहे.

anews Banner

Leave A Comment