• Home
  • जिंतूर तालुक्यातील करवली येथील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जिंतूर तालुक्यातील करवली येथील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0010.jpg

जिंतूर तालुक्यातील करवली येथील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

(परभणी)जिंतूर:- तालुक्यातील करवली येथील एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना २८ जून रोजी दुपारी तीन वाजता घडली. दरम्यान, आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
करवली येथील एका बारा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी घरात अभ्यास करत असताना आरोपीने पाणी मागण्याचा बहाना करून मुलीचा विनयभंग केला होता. त्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून करवली येथील दिलीप दत्तराव वारकड (वय २३ वर्ष) याच्यावर बोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने दिलीप वारकड याला ताब्यात घेऊन गुरुवारी (दि. ३०) जिंतूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक वसंत मुळे हे करीत आहेत.

anews Banner

Leave A Comment