Home परभणी हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री मा वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने 1...

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री मा वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने 1 जुलै हा कृषी दिन म्हणून मौजे अंगलगाव तांडा येथे साजरा करण्यात आला.

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0025.jpg

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री मा वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने 1 जुलै हा कृषी दिन म्हणून मौजे अंगलगाव तांडा येथे साजरा करण्यात आला.

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

(परभणी) जिंतूर:- दि ०१ जुलै तालुक्यातील अंगलगाव तांडा येथिल प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सकाळी 8:00 वाजता कृषी दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ लक्ष्मीबाई कंकर जाधव तर प्रमुख पाहुणे मा सुदामराव घुगे, सेवानिवृत्त विभागीय बीजप्रमाणिकरंन, विशेष मार्गदर्शक एस पी काळे तालुका कृषी अधिकारी जिंतूर, प्रगतशील शेतकरी श्री आर के घुगे यांनी उपस्थित शेतकरी यांना मार्गदर्शन केले.
यामध्ये तालुका कृषी अधिकारी श्री काळे यांनी सोयाबीन पिकावरील कीड, रोग या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले व शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून शेंद्रिय खताचा वापर करावा यासाठी कृषी विभागाच्या वतीने अनुदान दिले जाते, तसेच गांडूळ खत व मा (जिल्हाधिकारी)परभणी ,श्रीमती आंचल गोयल मॅडम यांच्या महिमेनुसार वृक्ष लागवड करण्यासाठी अनुदान उपलब्ध असून, जास्तीत जास्त प्रमाणात फळझाडे लावण्या बाबत आव्हान केले.
श्री सुदामराव घुगे यांनी पिकाच्या वेगवेगळ्या जातीची निवड, जातीची वैशिष्ट्य, लागवड अंतर, उत्पादन व फवारणी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले, प्रगतिशील शेतकरी श्री रामेश्वर घुगे यांनी शेतीत केलेले वेगवेगळे प्रयोग व अनुभव सांगितले तसेच उत्पादन खर्चात बचत कशी करावी याबाबत माहिती दिली… यावेळी गावातील पवन जाधव, राजू जाधव ,भगवान जाधव, सुभाष मुंढे, कनिराम पवार, पंढरी जाधव, वामन पवार, सौ माया जीवन जाधव तसेच गावातील महिला व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर कार्यक्रम पार पडण्यासाठी सेवा निवृत्त केंद्र प्रमुख कंकर जाधव सर, मुख्याध्यापक स्वामी सर यांनी प्रयत्न केले. सूत्र संचालन कृषी सहाय्यक श्री जी. टी. राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी किशोर शेळके यांनी मानले.. कृषी विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleजिंतूर तालुक्यातील करवली येथील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Next articleआपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here