Home बुलढाणा 15 वित्त आयोगातून वानखेड येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा तसेच अंगणवाडी केंद्रात...

15 वित्त आयोगातून वानखेड येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा तसेच अंगणवाडी केंद्रात RO फिल्टर सुविधा उपलब्ध

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0033.jpg

15 वित्त आयोगातून वानखेड येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा तसेच अंगणवाडी केंद्रात RO फिल्टर सुविधा उपलब्ध

युवा मराठा न्यूज व वेब पोर्टल प्रतिनिधी-रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर.

ग्रामीण विकास कामाकरिता केंद्र सरकार योजने अंतर्गत शासनाच्या 15 व्या वित्त आयोग मार्फत बंदिस्त तसेच अबंधीस्त निधी मधून शिक्षण आरोग्य तसेच उपजीविका या सदरात अनेक योजना आयोजित केलेल्या असतात.
आज दिनांक 29जून2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय वानखेड यांच्या कडुन जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा वानखेड तसेच महिला व बालकल्याण या सदराखाली अंगणवाडी क्रमांक 1ते 7 या केंद्राला शाळेत मुलांना पाणी पिण्याकरिता स्वछ पाणी मिळण्याकरीता ,मुलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी आज एक्वा आरो फिल्टर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे
यावेळी ग्रामविकास अधिकारी K.B धनवाडे साहेब, सरपंच श्रीमती मंगलाताई मनोहर रंगभाल,उपसरपंच राजेश महादेव पाखरे,सदस्य शिवाजी आमझरे, ग्रामपंचायत लिपिक शालीग्राम हागे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर एक्वा आरो फिल्टर प्लान ची माहिती देऊन वितरित करण्यात आले
जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळा येथील मुख्याध्यापक सुसतकर सर ,वानखडे सर, पवार मॅडम यांनी तसेंच अंगणवाडी मधील अंगणवाडी सेविका यांनी ग्रामपंचायत वानखेड ग्रामविकास अधिकारी ,सरपंच,उपसरपंच यांचे आभार व्यक्त केले

Previous articleनिखिल भामरे चे पिंगळवाडे येथे जल्लोषात स्वागत.
Next articleशक्तीहीन शेतकरी वाऱ्यावर: नेते शक्ती प्रदर्शनाच्या दौऱ्यावर! कृषिप्रधान जिल्ह्याचे दुर्दैवी चित्र
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here