Home नाशिक निखिल भामरे चे पिंगळवाडे येथे जल्लोषात स्वागत.

निखिल भामरे चे पिंगळवाडे येथे जल्लोषात स्वागत.

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0039.jpg

निखिल भामरे चे पिंगळवाडे येथे जल्लोषात स्वागत.

संदीप गांगुर्डे पिंगळवाडे

संक्षिप्त रूपात सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही पोस्ट केली होती त्याच अनुषंगाने निखिल यास प्रथम दिंडोरी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यास तब्बल ५० दिवस नाशिक मध्यवर्ती कारागृह मध्ये ठेवण्यात आले होते. याबाबत निखिल भामरे यांच्या वकिलांनी मुंबई हायकोर्ट येथे याचिका दाखल केली होती परंतु मुंबई हायकोर्ट यांचे माननीय न्यायाधीश यांनी निखिल भामरे यास निर्दोष मुक्त केले. दिनांक 30. 6 .2022 रोजी निखिल यास नाशिक मध्यवर्ती कारागृहातून मुक्तता करण्यात आले. त्यानंतर निखिल यांचे आपले जन्मगावी पिंगळवाडे येथे आणण्यात आले त्यांच्या सुटकेचा पिंगळवाडे ग्रामस्थ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडून मोठ्या थाटात सहर्ष स्वागत करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार निखिल भामरे व प्रदीप बच्छाव यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. त्यानंतर निखिल भामरे यांचा छोटे खानी पिंगळवाडे वासियांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक विभाग धर्म जागरण समिती अध्यक्ष प्रदीप बच्छाव यांनी निखिल चा सत्कार केला व आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नामपुर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कृष्णा भामरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व निखिल विषय आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी निखिल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना म्हटला की जे काही माझ्यावर खोटे कलम लागू केले त्यामुळे मला माझ्या कुटुंबाला हा त्रास सहन करावा लागला.
विशेष बाब म्हणजे निखिल चा जन्मदिवस याच दिवशी आहे याप्रसंगी ग्रामस्थांनी निखिल याची सुटका व वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला याप्रसंगी भाजपा तालुका उपअध्यक्ष रवी मानकर उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच निखिल याच्या वडिलांनी गावाचे व राष्ट्रीय स्वयं संघाचे तसेच माननीय न्यायाधीश मुंबई हायकोर्ट यांचेही आभार व ऋण व्यक्त केले

Previous articleडॉक्टर दिननिमित्त सत्कार करण्यात आला मा .जी नगरसेवक संजय नाना काटे युवा मंच वतीने
Next article15 वित्त आयोगातून वानखेड येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा तसेच अंगणवाडी केंद्रात RO फिल्टर सुविधा उपलब्ध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here