Home नाशिक स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत लासलगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं मंदिरात स्वच्छता अभियान

स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत लासलगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं मंदिरात स्वच्छता अभियान

147
0

आशाताई बच्छाव

IMG_20240121_082633.jpg

स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत लासलगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं मंदिरात स्वच्छता अभियान

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

अयोध्येत श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरात सोमवारी (ता. २२) श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे.
त्यानुसार लासलगाव मंडल सरचिटणीस निलेश अरुण जगताप यांनी लासलगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात स्वच्छता अभियानाचे आयोजन केले व लासलगाव मंडळ अध्यक्ष निलेश सालकाडे, उपाध्यक्ष रविंद्र होळकर व महिला मोर्चा नाशिक (ऊ) सरचिटणीस स्मिताताई कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून अभियान राबवत मंदिराची स्वच्छता केली.
तब्बल ५०० वर्षांनंतर प्रत्येक भारतीयाचे अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे त्यांच्या जन्मभूमीतील मंदिर अखेर साकारले आहे. या मंदिरात येत्या सोमवारी दुपारी बारा वाजून २० मिनिटांनी प्रभू श्रीराम, माता सीता, श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे.
या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास महाराज यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार भाजपा लासलगाव मंडल पदाधिकारी यांनीही शनिवारी दुपारी बालाजी नगर लासलगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात जाऊन पूर्ण मंदिर स्वच्छ धुऊन काढले, कचरा गोळा केला तसेच झाडू मारण्यासह फरशी पुसली व परिसर स्वच्छ केला.
या प्रसंगी भाजपचे लासलगाव मंडळ अध्यक्ष निलेश सालकाडे, उपाध्यक्ष रविंद्र होळकर, सरचिटणीस निलेश अरुण जगताप, महिला मोर्चा नाशिक (ऊ) सरचिटणीस स्मिताताई कुलकर्णी, उपाध्यक्ष नाशिक जिल्हा (ऊ) राजेंद्र चाफेकर, शहराध्यक्ष चंद्रशेखर होळकर, उद्योग आघाडी अध्यक्ष नितीन शर्मा, अनुसूचित जाती अध्यक्ष लक्ष्मण खालसे, डॉ. असो. मा. अध्यक्षा डॉ. संगीता सुरसे, सिमा पाटील, रजनी कुलकर्णी, अक्षदा जोशी, जयश्री दशपुत्रे, सुनिता जोशी, शेखर दशपुत्रे, मंदिर विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी, मंदिर विश्वस्त दिनेश जोशी, संतोष पवार, सुजित जाधव, सोमनाथ गांगुर्डे, भजन बिष्णोये, संतोष कापडणी, विकी साळवे, तसेच बालगोपाळ यांनीही स्वच्छ तीर्थ अभियानात भाग घेतला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous articleश्रीराम प्राण प्रतिष्ठापना:- संस्कार प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांची भव्य शोभायात्रा,ठिकठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी
Next article मुंबईत ग्राहक सेवा संस्थेच्या  नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here