Home भंडारा पडोळे लाँच करणार मोफत शैक्षणिक ॲप! ३० हजार विद्यार्थ्यांना मिळणार थेट लाभ...

पडोळे लाँच करणार मोफत शैक्षणिक ॲप! ३० हजार विद्यार्थ्यांना मिळणार थेट लाभ पुणे मुंबईचे तज्ञ घेणार वर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20240121_210957.jpg

पडोळे लाँच करणार मोफत शैक्षणिक ॲप!

३० हजार विद्यार्थ्यांना मिळणार थेट लाभ
पुणे मुंबईचे तज्ञ घेणार वर्ग
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा तथा २३ तारखेला वाढदिवसाचे युगल अवचित्य साधून प्रदीप पडोळे तुमसर मोहाडी विधानसभेत मोफत शैक्षणिक ॲप लाँच करणार आहेत. दोन्ही तालुक्यात ५ ते १० वी वर्गाचे शिक्षण घेणाऱ्या राज्य बोर्डाच्या तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. त्याकरिता २३ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्या दरम्यान विद्यार्थ्यांना सरल शिक्षा ॲपचे मोफत कूपन तथा किट वाटप करण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिकृत माहिती प्रदीप पडोळे यांनी आयोजित पत्र परिषदेतून दिली आहे. पुणे तथा मुंबई येथील तज्ञ शिक्षक त्या ॲप मधून विद्यार्थ्यांचे वर्ग घेणार, वेळेचे बंधन नसलेल्या त्या सॉफ्टवेअर मधून हजारो विद्यार्थी आपली शैक्षणिक प्रगती साधतील अशी अपेक्षा त्यावेळी पडोळे यांनी व्यक्त केली. शालेय जीवनात कठीण भासणाऱ्या ठळक विषयांना त्यातून केंद्र करण्यात आले आहे. त्याकरिता शहरातील तसेच तालुका स्तरावरील प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यावेळी उपस्थित राहण्याची विनंती देखील पडोळे यांनी केली आहे.
———————-
विज्ञान-गणितासह इंग्रजी होणार सोपी
– विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे येथील सरल शिक्षा लर्निग टीमने पडोळे यांच्या शिक्षण प्रेमी संकल्पनेला वास्तविकतेत साकारले आहे. अंजनाबाई चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत पडोळे यांनी अविरत १२ वर्षे शहरातील विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग उपलब्ध करून दिले आहे. आधुनिक तंत्रयुगाचे बोट धरून तीच योजना आता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरविले जाणार आहे. त्यातून विज्ञान, गणितासह इंग्रजी विषयाचे धडे गिरविले जाणार आहेत.
——————
ॲप आय प्रोटेक्शन सुरक्षेने सज्ज
– अधिक वेळपर्यंत मोबाईल अथवा तत्सम उपकरणे हाताळल्याने अनेकांना डोळ्याचे आजार सहन करावे लागतात. मात्र पडोळे यांनी साकारलेले ते शैक्षणिक ॲप आय प्रोटेक्शन सुरक्षेने सज्ज असून त्यामुळे विद्यार्थ्यांना डोळ्याची जळजळ, थकवा, दृष्टी जाण्याचे आजार उद्भवणार नाही.
—————
जिल्ह्यातील एकमात्र उपक्रम
– ऑनलाईन शिक्षण पुरविणाऱ्या अनेक संस्था सध्या हयात आहेत. परंतु त्याकरिता पालकांना अवाढव्य रोकड मोजावी लागते. मात्र पडोळे यांनी तीच सुविधा मोफत पुरवून दिल्याने शैक्षणिक क्षेत्रात साधले जाणारे ते एकमेव उपक्रम ठरणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले जाणार असून एक विद्यार्थी एक कूपन अश्या पद्धतीने किटचे मोफत वाटप केले जाणार आहे.

Previous articleधारणीचे प्राकृतिक व पारंपरिक सौंदर्य जगासमोर आले पाहिजे -आ.सौ.सुलभाताई खोडके
Next articleअक्षदा कलश शोभायात्रेचे परिसरात उत्साहात स्वागत- केतन खोरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here