• Home
  • 🛑 ऑक्सफर्डच्या कोरोना लशीची किंमत…! पुनावाला यांची माहिती…🛑

🛑 ऑक्सफर्डच्या कोरोना लशीची किंमत…! पुनावाला यांची माहिती…🛑

🛑 ऑक्सफर्डच्या कोरोना लशीची किंमत…! पुनावाला यांची माहिती…🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕सीरम इन्स्टिट्युट आणि ऑक्सफर्ड यांच्या एकत्रित कामाने निर्माण झालेली लशीचं प्राथमिक ह्युमन ट्रायल यशस्वी झाले आहे. त्यामुळे सगळीकडे दिलासादायक वातावरण आहे.

करोनाबाधित असणाऱ्या आणि नसणाऱ्या अशा एकूणच सर्वांना ही लस लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युचीही या लशीच्या निर्मितीत भागीदारी आहे, त्यामुळे भारतातही ही लस उपलब्ध होणार, हे नक्की झाले असले तरी या लशीची किंमत किती असेल हे जाणून घेण्यात सर्वानाच उत्सुकता आहे.

“लशीच्या किमतीबाबत आता काही बोलणं म्हणजे घाईचं होईल. मात्र लशीची किंमत एक हजारपेक्षा कमी ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू”, अशी माहिती सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पुनावाला यांनी दिली.

भारतात उपलब्ध होणाऱ्या ऑक्सफर्डच्या कोरोना लशीची किंमत ही एक हजारपेक्षाही कमी असेल. ही किंमत सर्वसामान्यांनाही परवडण्यासाराखी आहे,

अशी माहिती पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने दिली.⭕

anews Banner

Leave A Comment