Home पुणे सन्मान मातृत्व, नेतृत्व व कर्तृत्वाचा !

सन्मान मातृत्व, नेतृत्व व कर्तृत्वाचा !

41
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_075124.jpg

 

सन्मान मातृत्व, नेतृत्व व कर्तृत्वाचा !                       पुणे प्रतिनिधी दिपक कदम 

“आयडियल एज्युकेशन ट्रस्ट” यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजासाठी बहुमोल योगदान देणाऱ्या सफाई कर्मचारी, घरेलू कामगार भगिनी, ज्येष्ठ माता व पदवीधर भगिनी या महिलांचा विशेष “सन्मान सोहळा” आयोजित करण्यात आला.
खरंतर आई, बहीण, पत्नी, वहिनी, आजी अशा अनेक भूमिका एकाच वेळी निभावत असताना घराला, कुटुंबाला, समाजाला, देशाला दिशा देण्याचं काम आपल्या माता भगिनी करत असतात. त्यांच्या या अतुलनीय कार्याचा सन्मान करण्यासाठी एक “महिला दिन” पुरेसा नसून वर्षातील ३६५ दिवस माता भगिनींचा सन्मान झाला पाहिजे. महिलांना हा सन्मान मिळावा यासाठी देशाचा कारभार पुरोगामी विचारांच्या हातात असणे आवश्यक आहे, हाच निर्णय आपल्याला आगामी लोकसभा निवडणुकीत घ्यायचा आहे असे आवाहन उपस्थितांना केले व हा स्तुत्य सोहळा आयोजित केल्याबद्दल मा. शफी इनामदार व मा. शोएब इनामदार यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी माझे मार्गदर्शक मा . खासदार अमोल कोल्हे श्री. महादेव बाबर, माजी महापौर प्रशांत जगताप, निलेश मगर, माजी मंत्री रमेश बागवे, प्रविण तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleश्रीरामपूरच्या चारही बाजूचे रस्ते चौपदरी केले – आमदार कानडे
Next articleनाशिक भगवानगड शिवशाही बसचे स्वागत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here