• Home
  • 🛑 जेईई मेन परीक्षेचे अॅडमिट कार्ड लवकरच 🛑

🛑 जेईई मेन परीक्षेचे अॅडमिट कार्ड लवकरच 🛑

🛑 जेईई मेन परीक्षेचे अॅडमिट कार्ड लवकरच 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 12 ऑगस्ट : ⭕ जेईई मेन परीक्षेचे अॅडमिट कार्ड लवकरच जारी केले जाण्याची शक्यता आहे…१ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.

जेईई मेन परीक्षा देशातील प्रमुख प्रवेश परीक्षांपैकी एक आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) भारतातील विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत जेईई मेन (JEE Main 2020 Exam) परीक्षा आयोजित करणार आहे. जेईई मेन परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड १५ ऑगस्ट किंवा त्यानंतर जारी केले जाण्याची शक्यता आहे. कारण अधिकाऱ्यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे की एन्ट्रन्स परीक्षेचे आयोजन होण्यापूर्वी किमान १५ दिवस अगोदर जेईई मेन २०२० चे अॅडमिट कार्ड जारी केले जातील.

अॅडमिट कार्डवर उमेदवारांचे रोल नंबर आणि परीक्षा केंद्रांची माहिती असेल. जेईई मेन २०२० अॅडमिट कार्ड ऑनलाइन अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जारी केले जातील.

⭕ JEE Main 2020 Exam: या सूचनांचे पालन करा :-

➡️ करोना विषाणूमुळे परीक्षा केंद्रांवर तपासणी आणि सॅनिटायझेशनमध्ये अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याआधी किमान १ तास परीक्षा केंद्रावर पोहोचावे.

➡️ एनटीएचे संचालक विनीत जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यासाठी टाइम स्लॉट दिला जाईल. विद्यार्थ्यांनी या टाइम स्लॉटचे काटेकोर पालन करत दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचायचे आहे.

➡️ परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी उमेदवारांना ओळखपत्रासह आपलं जेईई मेन २०२० अॅडमिट कार्ड दाखवायचं आहे. परीक्षा केंद्राच्या आत अन्य कोणतंही सामान नेण्याची अनुमती नाही.

➡️ विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश केल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे.⭕

anews Banner

Leave A Comment