• Home
  • 🛑 यंदा बाळगोपाळांसोबत अशी साजरी करा ‘गोकुळष्टमी’ 🛑

🛑 यंदा बाळगोपाळांसोबत अशी साजरी करा ‘गोकुळष्टमी’ 🛑

🛑 यंदा बाळगोपाळांसोबत अशी साजरी करा ‘गोकुळष्टमी’
🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 12 ऑगस्ट : ⭕ श्रीकृष्णाचा जन्माष्टमी उत्सव हा भारतभर साजरा केला जातो. या सणाला बाळगोपाळांसह मोठ्यांपर्यंत सर्वांची धाम-धूम असते. मात्र, यंदा कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोकुळष्टमीच्या उत्सवावर विरजण पडले आहे. गोविंदांच्या जल्लोषाचा दिवस म्हणून गोपाळकाल्याकडे पाहिले जाते. थरावर थर लावणारी गोविंदा पथके यंदा गर्दीत नाही तर सोशल डिस्टन्सिंगसह नियमांच्या फेऱ्यात अडकली आहेत. त्यामुळे यंदा बच्चे कंपनीला या सणाचा आनंद घेता येणार नाही.

श्रीकृष्णाचा जन्माष्टमी उत्सव शाळांमध्ये मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. यादिवशी बच्चे कंपनीला राधा आणि कृष्ण बनवले जाते. मात्र, यंदा शाळा बंद असल्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना घरीच राधा, कृष्ण बनवा. यामुळे बच्चे कंपनी देखील खूश होईल.

जन्माष्टमीच्या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन या सणाचा आनंद घ्या. यामध्ये मुलांना देखील सामिल करा. यामुळे मुले देखील आनंदी होतील आणि उत्सव देखील साजरा होण्यास मदत होईल.

जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडी फोडण्याची परंपरा आहे. परंतु, यंदा कोरोना व्हायरस असल्यामुळे हे शक्य नाही. त्यामुळे यंदा तुम्ही दहीहंडीचे मुलांना महत्त्व समजवून सांगा. मुलांना जन्माष्टमीची कथाही सांगा. यामुळे त्यांना आपली परंपरा आणि धार्मिक गोष्टी कळण्यास मदत होईल.

बऱ्याच मुलांना क्राफ्ट आणि चित्रकलेची आवड असते. त्यामुळे यंदा मुलांकडून जन्माष्टमीचे चित्र काढून घेऊन हा उत्सव साजरा करा.⭕

anews Banner

Leave A Comment