• Home
  • 🛑 सुशांतसिंह राजपूत प्रकरणाला….! सुप्रीम कोर्टात वेगळे वळण – मृतदेह खाली का उतरवला….! 🛑

🛑 सुशांतसिंह राजपूत प्रकरणाला….! सुप्रीम कोर्टात वेगळे वळण – मृतदेह खाली का उतरवला….! 🛑

🛑 सुशांतसिंह राजपूत प्रकरणाला….! सुप्रीम कोर्टात वेगळे वळण – मृतदेह खाली का उतरवला….! 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. सुशांत राजपूतच्या आत्महत्येप्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या रिया चक्रवर्तीने पटनामध्ये दाखल प्राथमिक तक्रार मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे.

सुप्रीम कोर्टात – मुंबई पोलिस विरुद्ध बिहार पोलिस
पाटण्यात दाखल करण्यात आलेली एफआयआर अधिकृत;
बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपासापुढे ठेवले प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी मांडतायत बाजू

बिहार पोलिसांकडे तपास नको; सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची सुप्रीम कोर्टात मागणी
सुशांतसिंहच्या वडिलांच्या वतीने वकील विकाससिंह मांडतायत बाजू सुशांतने गळफास घेतला, कुटुंबिय येण्यापूर्वीच मृतदेह खाली का उतरवला? सुप्रीम कोर्टात उपस्थित झाला प्रश्न
तपास रोखण्यासाठीच बिहरामधील पोलिस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आलं, सुप्रीम कोर्टात बिहार पोलिसांकडून आरोप
मुंबईत कोणतिही चौकशी राहिलेली नाही : बिहार पोलिस
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीमागे बिहारमधील विधानसभा निवडणुकांचा संबंध : महाराष्ट्राचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडले मत
दरम्यान, मागील सुनावणीमध्ये केंद्र सरकारने बिहार सरकारची शिफारस मान्य केल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली होती.

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी शिफारस बिहार राज्य सरकारने केली होती. यावर महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप नोंदवला आहे.

तत्पूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बिहारमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार जबाबदार असल्याचा आरोप रिया चक्रवर्तीकडून करण्यात आला. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटनाही दु:खद आहे. ही घटना नेमकी बिहारमधील निवडणूकीच्या अगोदर घडली. या प्रकरणात राजकारण सुरु असल्याचा आरोप रिया चक्रवर्तीने केलाय. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणातील तपास सीबीआयकडे सोपवला तर कोणतीही हरकत नसेल असेही तिने म्हटले होते.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी पटना येथील राजीव नगर पोलिसात तक्रार दाखल केली होती.

25 जुलैला दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये रिया आणि अन्य सहा लोकांनी सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणात पटना पोलिस आणि मुंबई पोलिस आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. याशिवाय महाराष्ट्र सरकार आणि बिहार सरकार असा प्रकारही सुरु आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे….⭕

anews Banner

Leave A Comment