राजेंद्र पाटील राऊत
अनसिंग येथे ठाणेदार प्रशांत कावरे सर यांच्या हस्ते कराटे पटू यांचा सत्कार करण्यात आला.सोतोकॉन कराटे स्कूल अनसिंग मंगरुळपीर,(रितेश गाडेकर तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
ठाणेदार प्रशांत कावरे सर यांचा सत्कार कराटेपटू कु.पायल नवघणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच दुतीय ठाणेदार आशिष देशमुख सर यांचा सत्कार कु. पुनम राऊत तिने केला. नंदकिशोर कुरवाडे सर यांचा सत्कार गोपाल लाभांडे यांनी केला.
सोलापूर येथे झालेल्या स्किल डो मार्शल आर्ट च्या सेमिनार मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्याकरिता नवीन आलेले ठाणेदार प्रशांत कावरे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या क्लास चे मुख्य प्रशिक्षक सेन्साई बालकिसन नवघणकर सर यांना ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्ती विद्यार्थ्यांमध्ये प्रशिक्षक सौरभ बालकिसन नवघणगर सर व गोपाल लांभाडे,देवदत्त कोल्हे, कु.पायल नवघणकर,कु.पूनम राऊत, कु.गौरी निंबेकर,श्रावण चव्हाण, कु.श्यामल भागवत,प्रदीप ढगे या विद्यार्थ्यांनी सोलापूर येथे झालेल्या स्किल डॉ मार्शल आर्ट सेमिनार मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ट्रॉप्या देऊन सन्मानित करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले जातं असून भावी वाटचालीस शूभेच्छा देण्यात आल्या आहेत.




