Home पुणे दौंड तालुका शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने महिलांना अल्पदरात तीर्थायात्रा

दौंड तालुका शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने महिलांना अल्पदरात तीर्थायात्रा

615

राजेंद्र पाटील राऊत

दौंड तालुका शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने महिलांना अल्पदरात तीर्थायात्रा

दौंड तालुका प्रतिनिधी आकाश लगड

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने दौंड शहरातील महिलांन साठी अल्पदरात
आई काळूबाई, प्रति बालाजी मंदिर, नारायणपुर, संत सोपानकाका समाधी, कानिफनाथ गड दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले
या यात्रेचे प्रस्थान शुक्रवार दिनांक 10/2/22 रोजी सायंकाळी 9 वाजता गांधी चौक, भाजी मंडई, दौंड येथून शिवसेना नगरसेविका सौ. अनिताताई दळवी यांच्या हस्ते बसचे पुजन करण्यात आले व शिवसेना दौंड विधानसभा संघटक संतोष भाऊ जगताप यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आले
या वेळी विद्यमान नगरसेवक शहानवाजभाई पठान, रूपेश बंड, नामदेव राहिंज, संतोष जाधव, रूपेश कटारिया, उर्मिला भुमकर, सनी बंड, विनोद चौधरी, नौशादभाई खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते या यात्रेचे आयोजन शिवसेना वैद्यकीय कक्षाचे शहर अध्यक्ष अमोल राजाराम जगताप यांनी केले व ही यात्रा यशस्वी करण्या साठी योगेश गायकवाड, राकेश भोसले, सचिन बंड, कुणाल बंड, रूपेश जगताप यांनी परिश्रम घेतले.