Home बुलढाणा बावनबिर येथे ईदगाह परिसरात तुफान हाणामारी ; ५ व्यक्तींना पोलिसांनी केली अटक...

बावनबिर येथे ईदगाह परिसरात तुफान हाणामारी ; ५ व्यक्तींना पोलिसांनी केली अटक संग्रामपु

39
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220503-101150_Google.jpg

🛑 बावनबिर येथे ईदगाह परिसरात तुफान हाणामारी ; ५ व्यक्तींना पोलिसांनी केली अटक
संग्रामपुर तालुका विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे :-

तुफान हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या२७ वर्षे युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोनाळा पोलीस स्टेशन कडून मुस्लिम बांधवांना शांततेचे आवाहन करण्यात आले

सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे घटनास्थळी दाखल होऊन अनर्थ टळला

✒️ संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर येथील टुनकी मेन रोड वरील आज सकाळी ७:३० वाजता दरम्यान ईदगाव परिसर समोरील जुन्या वादातून एकमेंकांना जबर मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली. आज रमजान ईद निमित्त गावातील समस्त मुस्लिम बांधव नमाज पठण करण्याकरिता जात असताना अचानक दोन्ही गटातील व्यक्तींनी एकामेकांना गंभीर स्वरूपाचे मारहाण केल्याने या ठिकाणी उपस्थित पोलीस व ग्रामस्थ यांनी दोन्ही गटाच्या नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले.आणि आज घडलेल्या गंभीर घटनेतील व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले…!जुन्या वादातून एकमेकांची खुन्नस काढुन ईदगाव च्या समोरील मोठमोठ्याने शिवीगाळ करत तुफान हाणामारी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाणेदार श्रीधर गुट्टे हे घडलेल्या घटनास्थळी तात्काळ गाठत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Previous articleमालेगाव शहरावर पोलिसांची करडी नजर
Next articleविना परवाना देशी दारू अवैद्ध वाहतूक करतांना चार बॉक्स पकडले. दुकान मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here