Home Breaking News मालेगाव शहरावर पोलिसांची करडी नजर

मालेगाव शहरावर पोलिसांची करडी नजर

75
0

मालेगाव –  ( आंशुराज राजेद्र राऊत पाटिल वृतसंपादक युवा मराठा न्युज मालेगाव कार्यालय )
आगामी रमजान ईद व अक्षय तृतीया सणांच्या पाश्र्वभूमीवर सदर सण आनंदाच्या व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच पुर्व तयारी, नियोजन व रंगीत तालीम पुर्ण करण्यात आली आहे. समाजकंटकांवर पोलिस प्रशासन लक्ष ठेवून असून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. दंगा विरोधी संसाधने सतर्क ठेवण्यात आली आहेत. शासकीय रुग्णालय व अग्निशमन विभागाने अत्यावश्यक परिस्थिती बाबत तयारी पूर्ण केली आहे. 40 CCTV व 03 ड्रोन कॅमेरांचे माध्यमातून शहरावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सणांचे अनुषंगाने शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार असून राज्य राखीव दलाच्या/दंगा विरोधी पथकाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. सायबर सेल द्वारे सोशल मीडियावरील संदेशाची पडताळणी करण्यात येत असून चिथावणीखोर व आक्षेपार्ह संदेश तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते आहे. आगामी सण नागरिकांनी आनंदाने व उत्साहाने परंतु कायद्याचे पालन करुन साजरे करावेत कुठल्याही अफवांना व द्वेषाला बळी पडू नये. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी नागरिकांनी कुठलीही भिती न बाळगता आनंदात, उत्साहाने व कायद्याचे पालन करून सण साजरा करण्याचे आवाहन अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत खांडवी यांनी नागरिकांना केले आहे.

Previous articleधानोरा येथील दिव्यांग तपासणी मेळाव्याला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली भेट
Next articleबावनबिर येथे ईदगाह परिसरात तुफान हाणामारी ; ५ व्यक्तींना पोलिसांनी केली अटक संग्रामपु
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here