धानोरा येथील दिव्यांग तपासणी मेळाव्याला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली भेट
धानोरा येथे दिनांक २६ व २७ एप्रिल असा दोन दिवसीय दिव्यांग तपासणी मेळावा
तहसील कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या तपासणी मेळाव्याला धानोरा चे उपविभागीय अधिकारी मुरुगनन थम व तहसीलदार श्री गणवीर साहेब यांचीही उपस्थिती
दिनांक २७ एप्रिल २०२२ गडचिरोली
धानोरा सारख्या अति दुर्गम भागातून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊन दिव्यांगाची तपासणी करावी लागते त्याकरिता दिव्यांगाना अनेक अडचणींचा सामना करीत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धडपड करावी लागते ही बाब लक्षात घेऊन त्यांच्यासाठी धानोरा येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या तपासणी शिबिराला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भेट देऊन दिव्यांगाशी वार्तालाप केला. यावेळी धानोरा चे उपविभागीय अधिकारी मुरुगनन थंम, तहसीलदार श्री गणवीर साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.
धानोरा तालुक्यातील दिव्यांग बंधूंच्या अडचणी लक्षात घेता दिनांक २६ एप्रिल व २७ एप्रिल असे दोन दिवस या दिव्यांग तपासणी मेळाव्याचे आयोजन तहसील कार्यालयाच्या परिसरात करण्यात आले. यावेळी धानोरा तालुक्यातील अनेक दिव्यांगानी नोंदणी करून या मेळाव्याचा लाभ घेतला. यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेत त्यांच्याशी वार्तालाप केला