Home Breaking News जिग्नेश मेवाणी यांच्या अटकेविरोधात जिल्हा काँग्रेसचे निषेध आंदोलन

जिग्नेश मेवाणी यांच्या अटकेविरोधात जिल्हा काँग्रेसचे निषेध आंदोलन

28
0

जिग्नेश मेवाणी यांच्या अटकेविरोधात जिल्हा काँग्रेसचे निषेध आंदोलन

गडचिरोली:// गुजरात चे आमदार तथा काँग्रेसचे नेते जिग्नेश मेवाणी यांना पंतप्रधानाच्या नावाने ट्विट केल्या प्रकरणी आसाम पोलिसांनी बेकायदेशीर पणे अटक करून त्यांना आसाम ला घेऊन गेले व विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून आमदार जिग्नेश मेवाणी यांना कोठडीत पाठवण्यात आले आहे.
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने देशाच्या पंतप्रधानाच्या नावाने काही अपेक्षा करणारे ट्विट करणे हा काही अपराध नाही. लोकशाही व संविधानाने सर्वांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. परंतु भाजप पक्षाच्या सरकारने मनमाणीपणे, सर्व नियम धुळीस लावून हुकूमशाही मार्गाचा अवलंब करून विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील मोदींच्या नेतृत्वावातील भाजप सरकार विरोधात निषेध आंदोलन करन्यात आले व आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या त्वरित सुटकेकरिता जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्या मार्फत राष्ट्रपती महोदयांकडे मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी
प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ.चंदाताई कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, घनश्याम वाढई, जितू पाटील मुनघाटे, उपाध्यक्ष अनिल कोठारे, किसान काँग्रेस अध्यक्ष वामनराव सावसागडे , अनुसूचित जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अनुसूचित महिला अध्यक्ष अपर्णाताई खेवले, विधा कांबळे, भैय्याजी मुदमवार, प्रभाकर कुबडे, नंदू कायरकर, बाळू मडावी, हरबाजी मोरे, आशिष कामडी, संजय चन्ने, रुपेश टिकले, वसंत राऊत, प्रतीक बारसिंगे, दीपक रामाने, शेषराव तलमके, I. B. शेख, अरुण पुण्यपरेड्डीवार, बाबुराव गडसूलवार, कृष्णा नारदेलवार, कृष्णाजी झंझाल, घनश्याम मुरवतकर, गौरव येनप्रेडीवार, विपुल येलटीवार, कुणाल ताजने, विकास देशमुख , विलास रोहनकर, बंडू भोयर, गितेश देशमुख, गजानन रोहनकर, कुंदन झाडे, भुवन कोसनकार, किरण गेडाम, संजय गोहणे, चंद्रकांत मेश्राम सह अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleआमगाव येथे मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मान.खा.अशोकजी नेते..
Next articleधानोरा येथील दिव्यांग तपासणी मेळाव्याला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here