Home उतर महाराष्ट्र गोसावी गुरुजी क्रियाशील शिक्षक पुरस्कार गांगर्डे,राठोड,खेडकर,शेख,पुरी यांना जाहिर

गोसावी गुरुजी क्रियाशील शिक्षक पुरस्कार गांगर्डे,राठोड,खेडकर,शेख,पुरी यांना जाहिर

39
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_125620.jpg

गोसावी गुरुजी क्रियाशील शिक्षक पुरस्कार गांगर्डे,राठोड,खेडकर,शेख,पुरी यांना जाहिर

अहमदनगर,(दिपक कदम  प्रतिनिधी)– “शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले शिक्षक बंधू राम दादाबा गोसावी गुरुजी व त्रिंबक शिवराम गोसावी गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ वॉरियर्स फाउंडेशन,अहमदनगर कडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी 2022 करिता बाळासाहेब गांगर्डे, व संदीप राठोड यांची तर 2023 करिता बाळासाहेब खेडकर व नजमा शेख,सुजाता पुरी यांची निवड करण्यात आली” असल्याची माहिती वॉरियर्स फाउंडेशनच्या अध्यक्षा कवयित्री शर्मिला गोसावी यांनी दिली.
नांदेवली,मातोरी, खळेगाव ता.गेवराई, तळणी, घोटण ता.शेवगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावलेले राम दादा गोसावी गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा 2022 चा पुरस्कार संदीप राठोड,ज्ञानाअंकुर शिक्षण संस्था, निघोज यांच्या ‘भूक छळते जेव्हा’ या काव्यसंग्रहास तर 2023 चा पुरस्कार लक्ष्मण खेडकर,जि.प.प्राथमिक शाळा,ववा ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षक लक्ष्मण खेडकर यांना क्रियाशील शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
गुहा,देवळाली प्रवरा, शेटेवाडी ता.राहुरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावलेले त्रिंबक शिवराम गोसावी गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा 2022 चा पुरस्कार जि.प.प्राथमिक शाळा,साकुरी येथील बाळासाहेब गांगर्डे यांच्या ‘कष्टाळू माय बाप’ या लेखसंग्रहास तर 2023 चा पुरस्कार जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा, वहाली,ता.पाटोदा येथील नजमा शेख व जि.प.प्रा.शाळा,वडगाव गुप्ता येथील सुजाता पुरी यांना क्रियाशील शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूल, कॉटेज कॉर्नर पाठीमागे, सावेडी, अहमदनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभात सदर पुरस्कार वितरण केले जाणार असून स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.
तरी या पुरस्कार समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन सौ.संगीता गिरी,अनिता कानडे,भामा गोसावी,आरती गिरी यांनी केले आहे.

Previous articleदेशहितवादी’ ग्रंथाचे प्रकाशन करण्याचा आनंद अद्वितीय स्वरूपाचा आहे- आमदार बाळासाहेब थोरात
Next articleकथा- नातलग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here