• Home
  • *शरद पवारांनी नातवाला फटकारलं* *पण पुतण्या मात्र गप्पच*

*शरद पवारांनी नातवाला फटकारलं* *पण पुतण्या मात्र गप्पच*

*शरद पवारांनी नातवाला फटकारलं* *पण पुतण्या मात्र गप्पच*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक शब्दांमध्ये फटकारल्यानंतर राज्यभरात राजकीय चर्चेला उधाण आलं. शरद पवारांनी आपल्याच कुटुंबातील सदस्याला सार्वजनिकरित्या सुनावल्यानंतर पवार कुटुंबात संघर्ष निर्माण होत असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच अजित पवार यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
निवासस्थानाबाहेर पडल्यानंतर आज सकाळी अजित पवार यांना पत्रकारांनी पार्थवरील टीकेबद्दल प्रश्न विचारला.
मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता अजित पवार निघून गेले. त्यामुळे पक्ष आणि कुटुंबातील संघर्षाबद्दल अजित पवार यांनी सध्यातरी भाष्य करण्याचं टाळल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अजित पवार हे निवासस्थानावरून मंत्रालयाकडे गेले आहे. दुपारपर्यंत त्यांच्या मंत्रालयात विविध बैठका असून त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होतील, अशी माहिती आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पार्थ यांनी केलेल्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
‘माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही, तो अपरिपक्वव आहे’ अशा शब्दांत शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलीच कानउघडणी केली होती.
‘सुशांत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या 50 वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. सुशांतसिंग प्रकरणाची चर्चा करण्याचे कारण नाही. त्यामुळं कुणी काय आरोप केले यात मी खोलात जाणार नाही. माझ्या दृष्टीनं हा विषय तितका महत्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली तर नक्कीच दु:ख होते. परंतु, त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते,’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.

anews Banner

Leave A Comment