Home Breaking News *एक गाव एक गणपती*

*एक गाव एक गणपती*

91
0

*एक गाव एक गणपती*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषद आष्टा या शहरातील सर्व नागरिकांनी ,तरूण युवकानी एकत्र येऊन यंदाचा एक गणेश उत्सव हा एक गाव एक गणपती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आष्टा गावात आदर्श निर्माण केला.
गणेश उत्सव सणानिमित्त शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर कृष्णांत पिंगळे ,तहसीलदार सुनिल शेरखाने राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे, गट नेते विशाल शिंदे, एम ई सी बीचे एस एस पवार ,नगराध्यक्षा स्नेहा माळी, नगरसेवक विजय मोरे, शेरनबाब देवळे, जगन्नाथ बसुगडे ,पी एल घस्ते, अर्जून माने ,माजी नगरसेवक बाबासो सिध्द, सतीश माळी, प्रभाकर जाधव, सुनिल माने ,सदिप ताबवेकर, शकील मुजावर,युवा नेते उदय कुशिरे, सतीश बापट, समीर गायकवाड, शिवाजी चोरमुले,पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे,संजय सनदी उपस्थित होते
यावेळी एक मताने नगरपरिषद गांधी चौक येथे एकच गणपती बसवणे याबाबत चर्चा झाली कोरोना सारखी जागतिक महामारी आटोक्यात आणण्यासाठी या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता घरगुती साजरा करावा याबाबत पोलिस खाते व शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला यावेेेळी ६२ गणेेेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते आष्टयात एक गाव एक गणपतीचा निर्णयाचेे स्वागत केेले यावेळी कृषांत पिंगळे, वैभव शिंदे, तानाजी टकले ,सुनिल माने, बाबासो सिध्द ,भानुदास निंभोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

Previous article🛑 दोन दिवसांचा वेळ देतो…! तुकाराम मुंढेंनी खाजगी हाँस्पीटल ला दिला अल्टीमेटम 🛑
Next article*शरद पवारांनी नातवाला फटकारलं* *पण पुतण्या मात्र गप्पच*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here