Home मराठवाडा चिकटगाव येथे CDS जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्र्रध्दांजली

चिकटगाव येथे CDS जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्र्रध्दांजली

226
0

राजेंद्र पाटील राऊत

चिकटगाव येथे CDS जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली —————————————-
औरंगाबाद ब्युरो चीफ बबनराव निकम युवा मराठा न्यूज नेटवर्क ______________________________ बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला, त्यांचे वडील एल एस रावत हे देखील लष्करातच होते लेफ्टनंट जनरल रावत म्हणून ते ओळखले जायचे वडील लष्करात असल्याने त्यांचे बालपण देखील लष्करी शिस्तीमध्ये गेलं, बिपिन रावत हे 16 डिसेंबर 1978 रोजी सेवेत रुजू झाले,व 31 डिसेंबर 2019 रोजी लष्कर प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले, यानंतर त्यांची CDS म्हणून नियुक्ती करण्यात आली, बिपिन रावत यांनी 1 जानेवारी 2020 पासून या नवीन पदाचा पदभार स्वीकारला होता, CDS बिपिन रावत यांचं लष्करात महत्त्वाचं योगदान होतं, त्यांच्या महत्त्वाच्या वक्तव्यामुळे ते कायम चर्चेत राहत होते, उदाहरणार्थ काश्मीर संदर्भातील वक्तव्य, हवाईदलाला संदर्भातील वक्तव्य. काल तामिळनाडूतील कुन्नूर जवळ भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला,या अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टॉप जनरल बिपिन रावत यांच्यासह एकूण 13 अधिकारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, भारतीय वायुसेनेनेट्टिट करून CDS जनरल बिपिन रावत यांच्या होतात्म्याची पुष्टी केली रावत यांच्या धर्मपत्नी मधुलिका रावत या ही यावेळी हेलिकॉप्टर मध्ये होत्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्व नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे, त्याच बरोबर देशातील प्रत्येक गावा- गावात बिपीन रावत व त्यांच्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे त्यामध्ये
_____________________________ चिकटगाव येथे CDS जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली
_________________________
गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी राजेंद्र पाटील (सामाजिक कार्यकर्ते) आर के पाटील (माजी सरपंच) आनंद निकम (अध्यक्ष न्यू हायस्कूल) गणेश निकम (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस) बबनराव निकम (जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मराठा पत्रकार महासंघ) महेश निकम, किरण गायके, बाबासाहेब निकम, निलेश निकम, मनोज जपे (फौजी) राम निकम (फौजी) सागर निकम (फौजी) सचिन निकम, विष्णू निकम ,गणेश निकम, नंदू निकम, एकनाथ निकम, जगदीश निकम, अनिल निकम, पवन निकम आदींची यावेळी उपस्थिती होती

Previous articleजिंतूर तालुक्यातील माजी.आमदार विजय भांबळे यांच्या मुलिच्या गाडीने चौघांना उडवलं..
Next articleकिकवारीच्या “सट्टा किंगला” पोलिस किक मारणार कधी?आदर्श गावाची सट्टा मटकामुळे होतेय सर्वत्र नालस्ती…!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here