Home जालना पुज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र यांचे कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी – आ.कैलास गोरंटयाल

पुज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र यांचे कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी – आ.कैलास गोरंटयाल

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20230727-WA0061.jpg

पुज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र यांचे कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी – आ.कैलास गोरंटयाल

जालना(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)अखिल भारतीय भिक्खु संघाचे संघानुशाशक पुज्य भदन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर यांनी सर्व समाजाच्या हितासाठी आपले पूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे.त्यांचे हे कार्य येणाऱ्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करून आ.कैलास गोरंटयाल यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अखिल भारतीय भिक्खु संघाचे संघानुशाशक भदन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर यांचे काल दि.२६ जुलै रोजी पहाटे वयाच्या  ९२ व्या वर्षी निधन झाले.या निधनाचे वृत्त समजताच जालना विधानसभा मतदार संघाचे आ.कैलास गोरंटयाल यांनी शोक व्यक्त केला.आपले आणि भदन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते.त्यांनी केलेल्या सूचनेवरून आपण नागेवाडी येथील नालंदा बुद्ध विहारला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी तसेच तेथे विविध विकासाची कामे राबविण्यासाठी आपण मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी सांगितले.पूज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर यांनी आयुष्यभर समाजाच्या हितासाठी झोकून काम केले.धार्मिक आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला संघटीत करण्याबरोबरच योग्य दिशा दाखवण्याचे मौलाचे कार्य केले असून त्यांचे हे कार्य सदैव स्मरणात राहील आणि येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असेही आ.कैलास गोरंटयाल यांनी शेवटी सांगितले.

Previous articleसौ.शांताबाई बाठियां यांचे निधन
Next articleमाजी जि.प.शिक्षण सभापती उदय पाटील राजूरकर यांचे निधन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here