Home Breaking News परभणीसह परिसरात १४ ऑगस्ट पर्यंत संचार बंदी –

परभणीसह परिसरात १४ ऑगस्ट पर्यंत संचार बंदी –

105
0

परभणीसह परिसरात १४ ऑगस्ट पर्यंत संचार बंदी –

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

परभणी, दि.९ :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी महानगरपालिका हद्द आणि 5 किमी परीसरात कलम 144 नुसार रविवार दि. 9 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12 वाजेपासून ते दि.14 ऑगस्ट 2020 चे रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश परभणीचे जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
या संचारबंदीतुन सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी आणि त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने व वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवा, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक , वार्ताहर , प्रतिनिधी , वितरक तसेच पेट्रोलपंप वितरक , कर्मचारी व त्यांची वाहने आणि दुध विक्रेत्यांनी केवळ घरोघरी जावून सकाळी 6 ते 9 या वेळेत दूध विक्री करावी. राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल बँका, खाजगी बँका, नागरी सहकारी बँका केवळ रास्त भाव दुकानदार, पेट्रोल पंप चालक, गॅस वितरक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, कृषी सेवा केंद्र व कृषी साहित्य विक्री सेवा केंद्र, यांच्याकडून चलनाद्वारे पैसे भरणा करणे व बँकेची ग्रामीण भागात रोकड घेऊन जाणारी वाहने, खत कृषी बी बियाणे विक्री व वाहतूक त्यांची गोदामे आणि दुकाने यांच्या साठी लागणारी वाहने व कामगार, महा ई सेवा केंद्र व सीएससी सेंटर यांना फक्त पिक विमा संबंधित कामाकरिता रात्री 8 वाजेपर्यंत सूट, आदी व्यक्ती व समुहाला सुट राहील.
वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवेशिवाय नागरी भागात इतर कोणतीही व्यक्ती अथवा वाहने रस्त्याने, बाजारात, गल्लीमध्ये , घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येणार आहे. असेही जिल्हादंडाधिकारी परभणी यांनी आदेशात नमूद केले आहे.

Previous articleमहाराष्ट्र व कर्नाटक राज्याची पूरस्थितीची पाहणी
Next articleदुकानदार व कामगार, भाजी विक्रेते यांचीही कोविड १९ चाचणी करा ; केंद्राचे राज्यांना आदेश –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here