Home नांदेड माजी जि.प.शिक्षण सभापती उदय पाटील राजूरकर यांचे निधन.

माजी जि.प.शिक्षण सभापती उदय पाटील राजूरकर यांचे निधन.

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230728-WA0092.jpg

माजी जि.प.शिक्षण सभापती उदय पाटील राजूरकर यांचे निधन.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )

देगलूर- नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते उदय पाटील राजूरकर यांचे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी रात्री निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, 2 मुले, 2 मुली,भाऊ, सुना, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे. शनिवारी दुपारी भक्तापूर ता.देगलूर येथे त्यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्व.उदय पाटील राजूरकर यांचा जन्म त्यांचे मुळ गाव राजूर येथे झाला. निःस्वार्थी, चारित्र्यसंपन्न राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. अनेक उच्च पदावर असतानाही त्यांनी पदाचा कधीही दुरूपयोग होऊ दिला नाही.राजकारणावर भारी पकड असलेले स्व. राजूरकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी आर्थिक संपत्ती जमा करण्याचा मोह त्यांना जडला नाही.राजकारणासोबतच समाजकारणातही ते सक्रीय होते.शिक्षण सभापती असतानाही त्यांनी एकही शैक्षणिक संस्था काढली नाही. एक निष्कलंक राजकारणी म्हणून त्यांचा नामोल्लेख होतो. दांडगा जनसंपर्क, जीवाभावाचे असंख्य कार्यकर्ते या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. तत्कालीन बिलोली विधानसभा मतदारसंघात त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निशीब अजमावले होते. देगलूर पंचायत समितीचे सभापतीपदही त्यांनी यशस्वीरित्या भूषविले होते.अलिकडच्या काळात वार्धक्य आणि अंधत्वामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. परिणामी राजकारणापासून ते अलिप्त झाले. दृष्टी गेल्यानंतरही त्यांची स्मरणशक्ती मात्र अत्यंत तीक्ष्ण होती. मागील तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. उपचारासाठी त्यांना शहरातील भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे व्याही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दोन दिवसांपूर्वीच त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली होती. यावेळी भाजपा जिल्हा प्रवक्ते प्रल्हाद उमाटे यांचीही उपस्थिती होती.औषधोपचाराला प्रतिसाद न दिल्याने गुरुवारी रात्री त्यांची नांदेडला प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण देगलूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here