Home गडचिरोली अहेरीत आमसभा प्रलंबित समस्या मार्गी लावा!! “!कामात पारदर्शकता ठेवा

अहेरीत आमसभा प्रलंबित समस्या मार्गी लावा!! “!कामात पारदर्शकता ठेवा

44
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220511-WA0014.jpg

!!अहेरीत आमसभा प्रलंबित समस्या मार्गी लावा!!
“!कामात पारदर्शकता ठेवा
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना निर्देश !
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- रेंगाळत व प्रलंबित असलेले कामे मार्गी लावून कामात पारदर्शकता ठेवा असे निर्देश आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत दिले.
ते येथील इंडियन फंक्शन हॉल येथे बुधवार 11 मे रोजी अहेरी पंचायत समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या वार्षिक आमसभेत अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.
यावेळी मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, संवर्ग विकास अधिकारी प्रतीक चन्नावार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, नायब तहसीलदार दिनकर खोत, रा.काँ.चे कार्यकर्ते अरुण मुक्कावार, नगर सेवक अमोल मुक्कावार,श्रीकांत मद्दीवार, लक्ष्मण येरावार, श्रीनिवास विरगोनवार, संतोष तोरे, सुमित मोतकुरवार आदी मान्यवर उपस्थित होते.
आमसभेत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, मागील कार्याचा वृत्तांत वाचून रेंगाळत असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व विभाग प्रमुखांना दिले तसेच कामांमध्ये दर्जा टिकून राहावे यासाठी पारदर्शकता ठेवण्याचे निर्देश दिले. सोबतच कृषी, बी- बियाणे, वीज, सिंचन, शिक्षण, अंगणवाडी बालकांचे पोषण आहार, ग्राम पंचायत स्तरावरील कामे आदी कामांचे आढावा घेतले. आणि मूलभूत हक्क, अधिकार, विविध योजनेचे लाभ व सोयी सुविधा प्रत्येकांना प्राप्त व्हावे यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक लक्ष घालावे याकडेही लक्ष वेधले.
उल्लेखनीय म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व.आर.आर.पाटील यांचे उल्लेख व मुख्यालयी राहण्याविषयी पुष्टी जोडून शिक्षक व ग्राम सेवक मुख्यालयी वास्तव्यास राहण्याचे खडसावून सांगितले.
तसेच अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणारे विविध गावातील गावकऱ्यांचे प्रश्न व समस्या निमुटपणे ऐकून ते मार्गी लावण्यासाठी निर्देशही अधिकाऱ्यांना देऊन प्रश्न व सवाल उपस्थित करणाऱ्यांचे निरासन व समाधानही केले.
यावेळी विविध ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here