Home गडचिरोली मुरुमगाव ते कटेझरी या मार्गावरील सदर कामाची चौकशी करुन संबधित अधिकारी व...

मुरुमगाव ते कटेझरी या मार्गावरील सदर कामाची चौकशी करुन संबधित अधिकारी व कंञाटदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा।

62
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220511-WA0006.jpg

मुरुमगाव ते कटेझरी या मार्गावरील सदर कामाची चौकशी करुन संबधित अधिकारी व कंञाटदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): प्रधांनमंञी ग्रामसडक योजना ग्रा.मा.10/11/350 अंतर्गत मुरुमगाव ते कटेझरी या मार्गावर अंदाजीत किंमत 958.82 लक्ष रुपचे डांबरीकरण करण्याच आले.पंरन्तु सदर रस्त्याचे काम हे परिपुर्ण निष्कृष्ट दर्जाचे दिसुन येत असल्यामुळे सदर कामाची चौकशी करुण संबधित अधिकारी व कंञाटदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय माहीती अधिकार न्युज नेटवर्क चे जिल्हा उपसंपादक रोशन कवाडकर यांनी मुंख्यमंञी यांना निवेदनातुन केले आहे.
सविस्तर वृत्त या प्रमाणे कि मुरुमगाव ते कटेझरी एम.एच.1055 हा रस्ता दुरुस्ती व नविन डांबरीकरण रस्ता करणे असता या कामामध्ये अतिशय निष्कृष्ट काम झाल्याचे दिसुन येत आहे.जुन्या सिडी व वर्क न तोडता त्यावरच नविन निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याचे दिसुन आले आहे.खडीकरण व डांबरीकरण याचे काम अंदाजपञकानुसार करण्यात आलेले नसुन व काही सिडी वर्क चे काम न करता रंगरंगोटी करुन बिल तयार करण्यात आलेले आहे.झालेल्या कामाची गुणवत्ता उच्च दर्जाची नसल्याचे निदशनास आलेले आहे.सदर बाबीची माहीती ही माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार मागीतली असता सदर कामामध्ये खुप मोठे भष्ट्राचार असल्याचे उघडकिस आलेले आहे.सदर निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याचे दिसुन आले आहे तरी सदर प्रकरण हे गंभीर असुन याकडे सबंधित विभागाणे गांभिर्याने लक्ष देवुन तातडीने संबधित अभियंता व कंञाटदार यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी भारतीय माहीती अधिकार न्युज नेटवर्क चे जिल्हा उपसंपादक रोशन कवाडकर यांनी निवेदणातुन केली आहे.

Previous articleअहेरीत आमसभा प्रलंबित समस्या मार्गी लावा!! “!कामात पारदर्शकता ठेवा
Next articleमहाराष्ट्र काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी मध्ये नगरसेवक मिलींद खोब्रागडे आरमोरी महाराष्ट्रात टॉप 05 मध्ये।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here