Home गडचिरोली महाराष्ट्र काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी मध्ये नगरसेवक मिलींद खोब्रागडे आरमोरी महाराष्ट्रात टॉप...

महाराष्ट्र काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी मध्ये नगरसेवक मिलींद खोब्रागडे आरमोरी महाराष्ट्रात टॉप 05 मध्ये।

34
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220511-WA0009.jpg

महाराष्ट्र काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी मध्ये नगरसेवक मिलींद खोब्रागडे आरमोरी महाराष्ट्रात टॉप 05 मध्ये।

सर्वाधिक काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी करण्याऱ्या टॉप 10 नोंदणी कर्ता ह्यांचा मुंबई येथे सत्कार

मुंबई :,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ गडचिरोली)

ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस डिजीटल सभासद नोंदणी आयोजित करण्यात आली. त्याअंतर्गत देशभरातल्या 2.5 कोटी हून अधिक भारतीय कॉंग्रेस सभासद झाले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ने देखील 31 लाखहून अधिक सभासद नोंदणी झाली. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील सर्वाधिक सभासद नोंदणी कर्ता ह्यांची निवड करण्यात आली. आणि त्यामधील टॉप 10 नोंदणी कर्ता ह्यांचा दिनांक 10 मे 2022 रोजी सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र कॉंग्रेस निर्वाचन अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू,आमदार प्रणिती शिंदे ह्यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्यालय टिळक भवन, दादर, मुंबई येथे सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये फिरदोस पटेल, शोएब परवेज, संतोष दिंडे, यामिना खोसरे, मिलिंद खोब्रागडे, वाहिद बिजापुरे, सूरज गुरनुले, सरफराज खान, आणि यशराज पारखी ह्यांचा समावेश आहे. त्याक्षणी कार्यक्रमाचे निवेदन देवानंद पवार ह्यांनी केले तर विजेत्या टॉप 10 ह्यांच्या नावे आमदार प्रणिती शिंदे जाहीर केली. प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सर्व वरिष्ठ पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व हया वेळी निर्वाचन अधिकारी उपस्थित होते. प्रणिती ताई असे म्हटले की लवकरच ह्या 10 ही लोकांना पक्ष्याच्या महत्वांच्या पदावर स्थान देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
मिलिंद खोब्रागडे याचे कौतुक माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजुजी,आमदार प्रणिती ताई शिंदे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे आणी जिल्ह्यातील अनेक नेत्यानी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here