Home गडचिरोली प्रभाग क्रमांक १४ मधील खडसे व रामटेके लेआउट परीसरातील नागरिकांच्या समस्या तातडीने...

प्रभाग क्रमांक १४ मधील खडसे व रामटेके लेआउट परीसरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

38
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220511-WA0015.jpg

प्रभाग क्रमांक १४ मधील खडसे व रामटेके लेआउट परीसरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गोकुळनगर पासून विसापूर कडे जाणारा मोठा नाला, पिण्याच्या पाण्याची व रस्त्याची नसलेली सोय ह्या परिसरातील नागरिकांच्या मुख्य समस्या

खडसे व रामटेके लेआउट मालकांनी ले-आउट चे डेव्हलपमेंट न केल्याने या समस्या उद्भवल्या असून त्यांच्याविरुद्ध रेरा कायद्यांतर्गत कारवाई करा

मागील १५ वर्षापासून बजाज शोरूम ,गणेश नगर महिला महाविद्यालय ,खडसे व रामटेके लेआऊट परिसरातील नागरिक समस्याग्रस्त असून अजून पर्यंत पिण्याच्या पाण्याची व रस्त्याची सोय झालेली नाही, गोकुळनगर पासून विसापूर कडे जाणाऱ्या मोठ्या नाल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत असल्याने या समस्या तातडीने दूर कराव्या व खडसे व रामटेके लेआउट मालकांनी लेआउट चे डेव्हलपमेंट न केल्याने या समस्या उद्भवल्या असून त्यांच्याविरुद्ध रेरा कायद्यांतर्गत कारवाई करावी असे निर्देश आमदार डॉ देवरावजी होळी यांनी न प चे मुख्याधिकारी यांना या परिसराची पाहणी करताना केले.

यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ,श्री मैंदजी, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची स्थानिक भागातील नागरिकांनी जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन त्याबाबतचे निवेदन दिले. व समस्यांबाबत परिसराची पाहणी करण्याची मागणी केली आमदार महोदयांनी लगेच मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क करून प्रत्यक्ष घटनास्थळावर येण्याचे सुचविले. व परिसराची पाहणी केली.

सदर परिसराची आमदार महोदयांनी पाहणी केली असता सदर भागात रस्त्यांचा अजून पर्यंत विकास झालेला नसल्याचे दिसून आले. पिण्यासाठी पाण्यासाठी पाइपलाइन ची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही .योग्य प्रकारे नाल्यांचे बांधकाम करण्यात आलेले नाही, गोकुळ नगर परिसरातून विसापूर पुढे येणारा मोठा नाला त्यामुळे परिसरात पाण्याची होणारी साठवण व नागरिकांना होणारा प्रचंड मनस्ताप दूर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. या परिसरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात याकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांना यावेळी केल्या.
तसेच ज्या लोकांनी या भागात प्लॉट विक्री केले परंतु या भागाचा नियमाप्रमाणे विकास करून दिला नाही अशा खडसे व रामटेके ले आऊट मालकांवर रेरा अंतर्गत कारवाई करावी अशी सूचना त्यांनी मुख्याधिकारी यांना यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here