• Home
  • मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (प.दे.) येथे सरपंचपदी श्रीमती वनिताबाई रमेश गनलेवार तर उपसरपंचपदी सौ रमाताई संदीप सोनकांबळे यांची सर्वानुमते निवड..

मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (प.दे.) येथे सरपंचपदी श्रीमती वनिताबाई रमेश गनलेवार तर उपसरपंचपदी सौ रमाताई संदीप सोनकांबळे यांची सर्वानुमते निवड..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210211-WA0097.jpg

मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (प.दे.) येथे सरपंचपदी श्रीमती वनिताबाई रमेश गनलेवार तर उपसरपंचपदी सौ रमाताई संदीप सोनकांबळे यांची सर्वानुमते निवड..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दिनांक 11 फेब्रुवारी 2021 रोजी उंद्री. (प.दे.) ता. मुखेड येथे सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेऊन निवडीची प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथे पार पडली.बहुजन ग्राम विकास आघाडी पॅनल कडून श्रीमती वनिताबाई रमेश गनलेवार यांची सूर्यवंशी पार्वतीबाई भास्कर यांच्या विरोधात सरपंचपदी तर सौ.रमाताई संदीपराव सोनकांबळे यांची अडबलवार सुनिता रमेश यांची उपसरपंच पदी 5 – 4 अशी बहुमताने निवड झाली. या निवडीच्या वेळी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून बी.एल.वाघमारे सर, जांभळे सर. ग्रामविकास अधिकारी श्री डुमणे सर यांनी काम पाहिले. सरपंच पदाच्या निवडीनंतर कै. रमेश अण्णा गनलेवार यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करण्यात आले. पॅनल प्रमुख श्री माधवराव पाटील उंद्रीकर,श्री यशवंतराव बोडके सर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली .यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य.व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलिस प्रशासनाच्या वतीने श्री चिंचोले सर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यांच्या निवडीबद्दल गावातून व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

anews Banner

Leave A Comment