• Home
  • राजभवन सचिवालयाने विमान उपलब्धतेची खातरजमा करावयास हवी होती, मान्यता दिली नसल्याबाबत आदल्या दिवशीच निरोप दिला होता ; मुख्यमंत्री सचिवालय

राजभवन सचिवालयाने विमान उपलब्धतेची खातरजमा करावयास हवी होती, मान्यता दिली नसल्याबाबत आदल्या दिवशीच निरोप दिला होता ; मुख्यमंत्री सचिवालय

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210212-WA0002.jpg

राजभवन सचिवालयाने विमान उपलब्धतेची खातरजमा करावयास हवी होती, मान्यता दिली नसल्याबाबत आदल्या दिवशीच निरोप दिला होता ; मुख्यमंत्री सचिवालय

राजेश एन भांगे

मुंबई, दि.१२- राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती.
ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
राजभवनाने राज्यपाल महोदयांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती.
शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमा नुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक १० फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्या नंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही.
वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

anews Banner

Leave A Comment