Home अमरावती अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग

253

आशाताई बच्छाव

IMG_20240304_083617.jpg

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग
अज्ञात वाहन चालक मालका विरुद्ध गुन्हा दाखल.  . मयुर खापरे चांदुर बाजार तालुका प्रतिनिधी
अवैध गौणखनीज कारवायामध्ये अमरावती जिल्ह्यात चांदुरबाजार तालुका कायम आघाडीवर राहिला आहे. तहसीलदार गीतांजली गरड यांनी कार्यभार घेतल्यानंतर या कारवायामध्ये लक्षणीय वाढ झाली आहेच शिवाय अवैध वाळू जप्त करून ती घरकुल धरकांना मोफत वाटप करण्यातही अव्वल कामगिरी झाली आहे. यामध्येच आज दिनांक3/3/ 2024 रोजी पहाटे 3.45 वाजनेच्या सुमारास तहसीलदार गीतांजली गरड स्वतः पथकासमवेत कारवाई साठी गेल्या असता एक रेतीने भरलेल्या ट्रक ला अडवून त्याला थांबवण्यासाठी सांगितले असतानाही सदर ट्रक चालकाने गाडी उजव्या बाजूला घेऊन वेगाने पळ काढला. तरीही तहसीलदार आणि पथकाच्या गाडीने तब्बल पंधरा किलोमीटर पर्यंत गाडीचा थरारक पणे पाठलाग केला.परंतु ट्रक चालकाने वेगाने गाडी पळवून लावत पळ काढला. आज सदर चालक आणि मालक यांचेविरुद्ध चांदुरबाजार po st मध्ये गुन्हा नोंद करणेत आला आहे. ट्रकवर नंबर नसल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणेत आला आहे. त्यानंतर हि पथकाने बहिरम पोस्ट जवळ वाहन तपासणी केली. रात्री 2.30 पासून सदर पथक तालुक्यामध्ये सर्वत्र वाळूविरोधी कारवाईकरिता गस्त घालत होते. यामुळे तालुक्यातील वाळूमाफीयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यवाहीमध्ये स्वतः तहसीलदार गीतांजली गरड
मंडळ अधिकारी गजानन दाते तलाठी संकेत घोरपडे यांचे सह वाहन चालक नंदू पावडे तसेच कोतवाल प्रफुल्ल भाकरे. सौरभ चौधरी तसेच शिपाई थोरात सहभागी होते

Previous articleमैत्रीचे नाते प्रत्येकाने प्रामाणिकपणे जपणे गरजेचे
Next articleउज्वलाच्या ब्युटी पार्लरचे उद्घाटन – गर्ल गॉसिप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.