Home कोल्हापूर शिक्षकांनी शाळाबाह्य सर्वेक्षण करावे : रवींद्र ठोकळ

शिक्षकांनी शाळाबाह्य सर्वेक्षण करावे : रवींद्र ठोकळ

207

 

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षकांनी शाळाबाह्य सर्वेक्षण करावे असे आवाहन हातकणंगलेचे शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ यांनी केले.
वाठार (ता. हातकणंगले) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळाबाह्य सर्वेक्षण कार्यशाळेत रवींद्र ठोकळ बोलत होते. केंद्र समन्वयक अजमीर मणेर अध्यक्षस्थानी होते.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने शाळाबाह्य,अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष मोहीम उघडली आहे. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार असुन सर्वेक्षणाचे काम १० मार्च पर्यंत पूर्ण होणार आहे असेही रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी कन्या शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील, जीवन शिक्षण अंबपचे मुख्याध्यापक प्रतापराव शिंदे, कन्या शाळा अंबपचे मुख्याध्यापक मारुती पाटील, दिलीप चरणे, राजेंद्र रसाळ, प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleश्री क्षेत्र ओंकारेश्वर शिवालय संस्थान ब्राह्मणगाव वर्धापण दिन सोहळा,
Next articleवडापावचे पैसे बुडवणं पडलं महागात…गजा मारणे टोळीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.