Home कोल्हापूर छत्रपती संभाजीराजे यांचा ५०वा वाढदिवस

छत्रपती संभाजीराजे यांचा ५०वा वाढदिवस

127
0

राजेंद्र पाटील राऊत

छत्रपती संभाजीराजे यांचा ५०वा वाढदिवस

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती  यांचा आज ५० वा वाढदिवस.
राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी संभाजीराजेंचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. तसंच मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी संभाजीराजेंनी पुढाकार घेत सरकारला धारेवर धरुन समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
आज सकाळीच वाढदिवसानिमीत्त छत्रपतींनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. लोकांची सेवा करण्याचं आणखी बळ मिळू देत, असं साकडं त्यांनी अंबाबाई चरणी घातलं. दुसरीकडे सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून आज कोल्हापुरात दुर्गा परिषदेचंही आयोजन केलं गेलं आहे.
आजपर्यंत सामाजिक आणि राजकीय माध्यमातून मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. अशीच सेवेची संधी इथून पुढेही मिळावी. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कारण ठरावं. शिवशाहूंचा विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी कायम कटिबद्ध असेल. शिवशाहूंच्याप्रमाणे एक टक्का जरी काम करू शकलो तरी माझ्या जीवनाचं सार्थक होईल, अशा भावना छत्रपती संभाजीराजे यांनी वाढदिवसानिमित्त आज बोलताना व्यक्त केल्या .

युवा मराठा न्युज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here