Home बीड एसटी महामंडळाची विशेष सेवा; बीडमधून प्रयागराज, काशी आणि अयोध्येपर्यंत धावणार लालपरी

एसटी महामंडळाची विशेष सेवा; बीडमधून प्रयागराज, काशी आणि अयोध्येपर्यंत धावणार लालपरी

30
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240206_082326.jpg

एसटी महामंडळाची विशेष सेवा; बीडमधून प्रयागराज, काशी आणि अयोध्येपर्यंत धावणार लालपरी

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा 

बीड दि:०५  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लोकांसाठी बीड ते प्रयागराज,काशी आणि अयोध्येपर्यंत विशेष फेरीसाठी लालपरी सोडण्याचे नियोजन केले आहे.नुकतेच आयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्घाटन झाल्याने अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे.याच पार्श्वभूमीवर बीड विभागाने बीड ते अयोध्या लालपरी ची फेरी काढण्याचे नियोजन केले असून अयोध्येपासून प्रयागराज व काशी ही देवस्थाने देखील जवळच आहेत.येथे असलेल्या देवस्थानाविषयीही भाविकांमध्ये मोठी श्रद्धा आहे.यामुळे एकाच फेरीमध्ये या तिन्ही ठिकाणी भाविक भक्तांना देवस्थानांचे दर्शन करता यावे.याकरिता एसटी महामंडळाने बीडहुन लालपरी सोडण्याचे नियोजन केले आहे.या तिन्ही दर्शनासाठी सध्या बसचे भाडे ५१००, आसनशयन यानसाठी ६९०० तर शयन बससाठी ७५०० इतके भाडे द्यावे लागणार आहे.या फेरीसाठी आसन क्षमतेनुसार एकत्रित प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यास मागणीनुसार बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.हा प्रवास खूप मोठा असल्याने या प्रवासासाठी सुसज्ज आणि नवीन बस वापरण्यात येणार असल्याचे विभागीय कार्यालयाने सांगितले आहे. उद्या दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ मंगळवार पासून बीडहून तिन्ही प्रकारातील बस भाविकांच्या मागणीनुसार अयोध्येच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.शिवाय आगामी काळात भाविकांच्या प्रतिसादावर बस कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.बीडहून काशी,प्रयागराज व अयोध्येला उत्तर प्रदेश सारख्या राज्यात पहिल्यांदाच लालपरी पाठवण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाकडून घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here